लोकमत न्यूज नेटवर्ककोरची : तालुक्यात कमी दाबाचा व अनियमित वीज पुरवठा होत असल्याने ग्राहक त्रस्त झाले आहेत. वारंवार निवेदने देऊनही वरिष्ठ अधिकारी दुर्लक्ष करत असल्यामुळे महावितरण कंपनीविरोधात येत्या ४ आॅगस्टला कोरची-कुरखेडा मार्गावर चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा तालुक्यातील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.स्थानिक हनुमान मंदिरात गुरूवारी सर्वपक्षीय बैठक श्यामलाल मडावी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या बैठकीत तालुक्यातील विविध समस्यांवर चर्चा करून आंदोलन समितीची नियुक्ती करण्यात आली. या समितीने येत्या ४ आॅगस्टला कोरची-कुरखेडा मार्गावरील झंकारगोंदी फाट्यावर बेमुदत चक्काजाम आंदोलन करण्याचा निर्णय घेतला.कुरखेडा कोरची विद्युत जोडणी रस्त्याच्या कडेला स्थानांतरित करेपर्यंत देवरीवरून विद्युत पुरवठा नियमित सुरू ठेवण्यात यावा, तहसील कार्यालय, ग्रामीण रु ग्णालयाचे फिडर वेगळे करण्यात यावे, कोरची येथील वीज उपकेंद्राला पाच-पाच पॉर्इंटचे दोन ट्रान्सफॉर्मर लावावे अशीही मागणी असल्याचे समितीचे अध्यक्ष शामलाल मडावी, सचिव नंदकिशोर वैरागडे, नसरु भाई भामानी, आनंद चौबे, मनोज अग्रवाल, पंचायत समिती सभापती श्रावण मातलाम, सरपंच जमकातन, पं.स. सदस्य कचरीबाई काटेंगे, कोरची नगरपंचायत अध्यक्ष ज्योती नैताम, उपाध्यक्ष कमलनारायन खंडेलवाल, पं.स. सदस्य सदाराम नुरु टी, सरपंच संघटनेचे अध्यक्ष हेमंत मानकर व इतर पदाधिकाऱ्यांनी कळविले.वीज पुरवठ्यासह इतरही मागण्यागेल्या दीड महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने पिके करपून गेली आहेत. त्यामुळे आता रोवणीयोग्य पिके नसल्याने कोरची तालुका दुष्काळग्रस्त घोषित करु न हेक्टरी ५० हजार रुपये आर्थिक मदत करावी आणि कमी कालावधीच्या पिकाबाबत कृषी विभागाने मार्गदर्शन करून बी-बियाणे व खताचा पुरवठा करावा, कोरची तालुक्यात बीएसएनएलचे नेटवर्कसुरळीत करावे, कुरखेडावरून कोरचीला येणारा विद्युत पुरवठा मोठ्या जंगलातून येत असल्याने ब्रेकडाऊन पाहण्यासाठी अडचणी निर्माण होतात. त्यामुळे ही विद्युत जोडणी कुरखेडा-कोरची रस्त्याच्या कडेला शिफ्ट करावी, आदी मागण्या या आंदोलनाच्या निमित्ताने रेटून धरल्या जाणार आहेत.
वीज समस्येविरोधात कोरचीत वाढले असंतोषाचे वातावरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2020 05:00 IST
स्थानिक हनुमान मंदिरात गुरूवारी सर्वपक्षीय बैठक श्यामलाल मडावी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या बैठकीत तालुक्यातील विविध समस्यांवर चर्चा करून आंदोलन समितीची नियुक्ती करण्यात आली. या समितीने येत्या ४ आॅगस्टला कोरची-कुरखेडा मार्गावरील झंकारगोंदी फाट्यावर बेमुदत चक्काजाम आंदोलन करण्याचा निर्णय घेतला.
वीज समस्येविरोधात कोरचीत वाढले असंतोषाचे वातावरण
ठळक मुद्दे४ ला चक्काजाम : सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचे निवेदन