शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नक्षलवाद्यांची पुन्हा दडपशाही, पोलीस खबऱ्या असल्याच्या संशयावरुन इसमाची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2019 18:22 IST

मर्दहूर गावातील घटना : लग्न समारंभाच्या ठिकाणाहून घेतले ताब्यात

भामरागड (गडचिरोली) : कुरखेडा तालुक्यातील वाहन जाळपोळ तसेच भूसुरूंग स्फोटात १५ पोलीस जवान शहीद झाल्याच्या घटनेची शाई वाळते न वाळते नक्षलवाद्यांनी भामरागड तालुक्यात आपल्या हिंसक कारवाया सुरू केल्या आहेत. पोलीस खबऱ्या असल्याच्या संशयावरून नक्षलवाद्यांनी एका इसमाची हत्या केल्याची घटना रविवारी पहाटेच्या सुमारास भामरागड तालुक्याच्या मर्दहूर येथे उघडकीस आली. 

डुंगा कोमटी वेडद (३५) रा. नैनवाडी असे नक्षल्यांनी ठार केलेल्या इसमाचे नाव आहे. नैनवाडी गावापासून तीन किमी अंतरावर असलेल्या मर्दहूर गावात शनिवारी रात्रीच्या सुमारास लग्न समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या लग्न समारंभासाठी डुंगा वेडद हा आपल्या गावातील काही नागरिकांसोबत मर्दहूर गावात आला होता. लग्न समारंभाच्या ठिकाणी असतानाच रात्रीच्या सुमारात नक्षलवादी तेथे आले. डुंगा वेडद याला गावाबाहेर नेऊन त्याची हत्या केली. त्याच्या पश्चात पत्नी, एक मुलगी व एक मुलगा असा आप्त परिवार आहे. नक्षलवाद्यांच्या या हिंसक कारवाईमुळे भामरागड तालुक्यात नक्षल्यांची दहशत निर्माण झाली आहे. नक्षलवाद्यांनी पोलीस खबऱ्या असल्याच्या संशयावरून वेडद याची हत्या केल्याचे बोलल्या जात आहे. 

नारगुंडा पोलीस मदत केंद्राच्या हद्दित नैनवाडी हे गाव आहे. भामरागड तालुका मुख्यालयापासून मर्दहूर हे गाव ३० ते ३२ किमी अंतरावर आहे. भामरागड येथून सदर गावाला जाण्यासाठी पक्का रस्ता नाही. घनदाट जंगलातून बैलबंडीचा रस्ता जातो.  त्यामुळे मृतक वेडद याचा मृतदेह वृत्त लिहिस्तोवर भामरागड येथे शवविच्छेदनासाठी आणण्यात आला नव्हता. रविवारी पहाटेची घटना असली तरी या घटनेची तक्रार देण्यासाठी दुपारी १ वाजेपर्यंत नारगुंडा पोलीस मदत केंद्रात कोणीही पोहोचले नव्हते.

टॅग्स :naxaliteनक्षलवादीMurderखूनCrime Newsगुन्हेगारी