शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

आकांक्षित जिल्हा रिक्तपदांनी खिळखिळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2018 01:21 IST

देशातील ११५ आकांक्षित जिल्ह्यांत समावेश असलेल्या गडचिरोलीला प्रगत जिल्ह्यांच्या यादीत आणण्यासाठी केंद्र सरकार कोट्यवधी रुपये खर्च करीत आहे. पण विविध योजनांच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक असलेल्या मनुष्यबळाची कमतरता अजूनही जाणवत आहे.

ठळक मुद्दे२३ टक्के अधिकाऱ्यांच्या खुर्च्या रिकाम्या : २६ टक्के महसूल कर्मचाºयांची पदे रिक्त

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : देशातील ११५ आकांक्षित जिल्ह्यांत समावेश असलेल्या गडचिरोलीला प्रगत जिल्ह्यांच्या यादीत आणण्यासाठी केंद्र सरकार कोट्यवधी रुपये खर्च करीत आहे. पण विविध योजनांच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक असलेल्या मनुष्यबळाची कमतरता अजूनही जाणवत आहे. महसूल विभागात अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची अनेक पदे रिक्त असल्यामुळे हा आकांक्षित जिल्हा खिळखिळा होत आहे.कोणत्याही योजनेच्या अंमलबजावणीसाठी पुरेशा मनुष्यबळाची गरज असते. त्यातही गडचिरोलीसारख्या नक्षलग्रस्त आणि दुर्गम भागात संपर्काची साधने कमी असल्यामुळे जास्त मनुष्यबळाची गरज आहे. पण जास्त मनुष्यबळ देणे दूर, मंजूर आहे ते मनुष्यबळही या जिल्ह्याला मिळू शकत नसल्यामुळे योजनांच्या अंमलबजावणीत अडथळे येत आहेत.महसूल विभाग हा जिल्हा प्रशासनाचा कणा मानला जातो. सरकारी योजनांच्या अंमलबजावणीपासून तर शासनाला महसूल मिळवून देण्यापर्यंत अनेक महत्वाच्या जबाबदाऱ्या या विभागाला पार पाडाव्या लागतात. अशा स्थितीत गट-अ मधील (क्लास वन) अधिकाऱ्यांची ३३ पैकी ८ पदे रिक्त आहेत. त्यात अपर जिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी (रोहयो), उपजिल्हाधिकारी (सामान्य) आणि जिल्हा पुरवठा तसेच एटापल्ली व कुरखेडा येथील उपविभागीय अधिकाऱ्यांचा समावेश आहे. अधिकाºयांच्या या रिक्त पदांमुळे एका अधिकाऱ्याला तीन-तीन प्रभार सांभाळावे लागत आहेत.गट-ब मध्ये मोडणाऱ्या नायब तहसीलदारांची ७८ पैकी १७ पदे रिक्त आहेत. त्यामुळे ठिकठिकाणच्या तहसील कार्यालयातील कारभारावर परिणाम झाला आहे. गट-क मधील कर्मचाऱ्यांची ७०८ पैकी १०० पदे रिक्त आहेत. तर गट-ड मधील १५३ पैकी ६८ पदे (४४.४४ टक्के) रिक्त आहेत.विशेष म्हणजे दर महिन्याला विभागीय आयुक्त कार्यालयात जिल्हाधिकाऱ्यांची बैठक होते. त्यात रिक्त पदांचाही आढावा घेतला जातो. ही माहिती शासनापर्यंत पोहोचते. तरीही या जिल्ह्यातील अधिकारी-कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरण्याच्या बाबतीत शासनाकडून उदासीनता दाखविली जात आहे. आकांक्षित जिल्हा या नात्याने तरी या जिल्ह्यातील महसूल विभागासह इतर सर्व विभागांमधील रिक्त पदे तातडीने भरून जिल्ह्याच्या प्रगतीमधील अडथळे दूर करावेत, अशी अपेक्षा नागरिकांकडून केली जात आहे.आर.आर. पाटलांनी भरली होती सर्व पदेआघाडी सरकारच्या काळात तत्कालीन गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी स्वत:हून या जिल्ह्याचे पालकमंत्रीपद स्वीकारून विविध लोकोपयोगी कामांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मिळवून दिला होता. यादरम्यान त्यांनी गडचिरोली जिल्ह्यातील सर्व विभागांमधील रिक्त पदे भरून प्रथमच या जिल्ह्याला परिपूर्ण केले होते. परंतू गेल्या चार वर्षात पुन्हा स्थिती बदलली असून रिक्त पदांची संख्या वाढत आहे.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारी