शहरं
Join us  
Trending Stories
1
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
2
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
3
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
5
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
6
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
7
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
8
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
9
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
10
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
11
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
12
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
13
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
14
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
15
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
16
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
17
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
18
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
19
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
20
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू

आष्टी पोलिसांची दिवसरात्र गस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 06, 2020 5:00 AM

आंबेडकर चौकात १ पथक तसेच दुसरे फिरते पथक, घाटकुळ येथे चंद्रपूर जिल्हा सीमेवर पोलीस कर्मचारी २४ तास थांबून काम करीत आहेत. परंतु नागरिक गरज नसतानासुद्धा घराबाहेर पडून फिरत असल्याचे दिसत आहेत. कोरोनामुळे जगातील लाखो नागरिक ग्रस्त आहेत. अशावेळी पोलीस, डॉक्टर आपला जीव धोक्यात घालून नागरिकांची सुरक्षा व्यवस्था सांभाळत आहेत.

ठळक मुद्देजिल्ह्याची सीमा बंद : अत्यावश्यक सेवेतील व परवानगी असलेल्या वाहनांनाच मुभा

लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी : कोरोनाच्या आजाराने थैमान घातल्यानंतर संचारबंदी लागू करण्यात आली. नागरिकांना घरात राहण्याच्या सूचना दिल्यानंतरही काही नागरिक घराबाहेर पडत आहेत. विनाकारण व रिकामटेकड्या बाहेर फिरणाऱ्या नागरिकांवर अंकूश ठेवण्यासाठी आष्टी पोलिसांनी जिल्हाबंदी करून आष्टी येथे चेक पोस्ट उभारला. या चेकपोस्टच्या माध्यमातून ये-जा करणारे वाहन व नागरिकांवर पोलिसांची २४ तास नजर आहे.येथील आंबेडकर चौकात १ पथक तसेच दुसरे फिरते पथक, घाटकुळ येथे चंद्रपूर जिल्हा सीमेवर पोलीस कर्मचारी २४ तास थांबून काम करीत आहेत. परंतु नागरिक गरज नसतानासुद्धा घराबाहेर पडून फिरत असल्याचे दिसत आहेत. कोरोनामुळे जगातील लाखो नागरिक ग्रस्त आहेत. अशावेळी पोलीस, डॉक्टर आपला जीव धोक्यात घालून नागरिकांची सुरक्षा व्यवस्था सांभाळत आहेत. त्यांच्या या कार्यात नागरिकांनीही त्यांना सहकार्य करण्याची गरज आहे.गडचिरोली जिल्ह्यात आष्टी येथे वैनगंगा नदीपासून चंद्रपूर जिल्ह्याची सीमा प्रारंभ होते. जिल्हा बंदीमुळे नागरिकांना दुसºया जिल्ह्यात जाता येत नाही. जिल्हा सीमेवर पोलीस २४ तास कार्यरत आहेत. येणाºया प्रत्येक वाहनाची कसून चौकशी केली जात असून जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक सुरळीत सुरू आहे. विनाकारण दुचाकीवर फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. संचारबंदीच्या नियमाचे उल्लंघन करणाºया दोन इसमांवर आष्टी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. विनाकारण फिरणाºया दुचाकीस्वारांना पोलीस चोपही देत आहेत. या सर्व सुरक्षा व्यवस्थेवर पोलीस निरीक्षक रजनीश निर्मल यांची नजर आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याPoliceपोलिस