शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

क्षमता परीक्षेवर आश्रमशाळा शिक्षकांचा बहिष्कार, २१ जणांनीच दिली परीक्षा

By दिलीप दहेलकर | Updated: September 17, 2023 20:55 IST

प्रशासनाची उडाली तारांबळ : नागपूर विभागात केवळ ०.०१ टक्के परीक्षार्थींनी परीक्षा दिली

गडचिरोली : आदिवासी विकास विभाग अंतर्गत आयुक्त स्तरावरून राज्यातील शासकीय व अनुदानित आश्रम शाळेतील शिक्षकांची क्षमता परीक्षा राज्यभरात रविवार,१७ सप्टेंबर रोजी दुपारी २.०० ते ३.३० या वेळेत आयोजित करण्यात आली होती. या परीक्षेवर जवळपास शंभर टक्के शिक्षकांनी एकजुटीने बहिष्कार घातल्याने गडचिरोली जिल्ह्यासह राज्यातील परीक्षा केंद्रावर प्रशासनाची तारांबळ उडाली. आणलेले प्रश्नपत्रिकेचे गट्टे परत घेऊन जाण्याची नामुष्की परीक्षा व्यवस्थापन अधिकाऱ्यांवर आली. आदिवासी विकास विभागाच्या इतिहासात पहिल्यांदा अशी घटना घडली. यापुढे शिक्षकांची मानहानी करण्याचे आदिवासी विकास विभागाने थांबवावे, असे आवाहन आदिवासी विकास शिक्षक व कर्मचारी संघटनेने केले आहे. नागपूर विभागात केवळ ०.०१ टक्के परीक्षार्थींनी परीक्षा दिली.

शिक्षकांनी परीक्षेकडे पाठ फिरविल्याने परीक्षा केंद्रप्रमुख,पर्यवेक्षक व परीक्षा व्यवस्थापन अधिकाऱ्यांना शेवटी हताश व्हावे लागले. आदिवासी विकास विभाग आयुक्तालय अंतर्गत नाशिक, ठाणे ,अमरावती व नागपूर हे चार विभाग आहेत. याअंतर्गत राज्यात ५९६ शासकीय तर ५५६ अनुदानित अशा एकूण १ हजार १५२ शाळा आहेत. क्षमता परीक्षेवर १० हजारावर शिक्षकांनी बहिष्कार घातला. शिकवत नसलेल्या विषयाची एकत्रित प्रश्नपत्रिका परीक्षा घेऊन या शाळेतील शिक्षकांचे मानसिक खच्चीकरण व बदनामी करण्याचा हा प्रकार असल्याच्या कारणाने महाराष्ट्रातील सर्व शिक्षकांनी या परीक्षेला विरोध केला.

वेळोवेळी शिक्षकांच्या प्रशिक्षणामध्ये त्या त्या विषयाची परीक्षा होत असताना वेगळी परीक्षा घेण्याची गरज का? असा प्रश्न शिक्षकांनी केला. या क्षमता परीक्षेवर बहिष्कार घालण्याचे आवाहन संघटनेचे राज्याध्यक्ष डॉ.डी.एल.कराड यांनी केले होते. संघटनेचे राज्य पदाधिकारी, सर्व विभागीय अध्यक्ष, प्रकल्प अध्यक्ष व सर्व पदाधिकारी यांनी आपली शक्ती एकटावून आश्रमशाळेतील सर्व शिक्षकांना बहिष्कार घालण्यास प्रोत्साहित केले. बहिष्कार आंदोलनास सीटू संघटना, अनुदानित आश्रम शाळा कर्मचारी संघटना, आश्रम शाळा मुख्याध्यापक संघ, संस्कृती संघटना आदी संघटनेने पाठिंबा दिला होता.

प्रकल्पनिहाय परीक्षार्थीं उपस्थिती 

गडचिरोली - ००चंद्रपुर - ००वर्धा - ००नागपूर - ०२ (अनुदानित)चिमूर - ०६ (अनुदानित नवनियूक्त)देवरी - ०१ ( शासकीय) भंडारा - ००अहेरी - १० (तासिका) भामरागड - ०२ (तासिका) एकुण - २१ 

शासकीय आश्रमशाळा शिक्षकांची पुर्णता पाठशासकीय व अनुदानित आश्रमशाळेतील शिक्षकांची क्षमता परीक्षा १७ सप्टेंबर रोजी दुपारी २.०० ते ३.३० वाजता आयोजित करण्यात आली होती. या परीक्षेवर शिक्षकांनी एकजुटीने बहिष्कार घातल्याचे गडचिराेली येथील शासकीय इंग्रजी माध्यमाच्या आश्रमशाळेच्या परीक्षा केंद्रावर दिसून आले. या केद्रावर एकाही शिक्षकांनी परीक्षा दिली नाही, हे विशेष. नागपूर विभागात परीक्षा दिलेल्या २१ शिक्षकांमध्ये अनुदानित व तासिका तत्वावरील शिक्षकांचा समावेश आहे. नागपूर विभागात ९९.९९ शिक्षक बहिष्कारामध्ये सहभागी झाले. ०.०१ टक्के शिक्षक क्षमता चाचणीस उपस्थित हाेते. 

टॅग्स :Teacherशिक्षकGovernmentसरकारSchoolशाळाexamपरीक्षा