शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
3
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
4
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
5
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
6
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
7
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
8
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
9
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
10
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
11
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
12
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
13
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
14
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
15
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
16
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
17
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
18
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
19
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!

ऐन पावसाळ्यात आरमोरी-गडचिरोली राष्ट्रीय महामार्ग गेला 'खड्यात'!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2024 15:25 IST

सुसाट वाहनांचा जीवघेणा प्रवास : दुरुस्तीसाठी मोठ्या अपघाताची प्रतीक्षा ?

लोकमत न्यूज नेटवर्क आरमोरी : आरमोरी ते गडचिरोली या राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडून मार्गाची प्रचंड दुरवस्था झाली आहे. त्यामुळे सदर महामार्गाची तात्काळ दुरुस्ती करून मार्ग वाहतुकीसाठी सुरळीत करण्याची आवश्यकता आहे. 

आरमोरी-गडचिरोली या जवळपास ३५ किलोमीटर असलेल्या महामार्गावर अनेक गावाजवळ ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असल्याने वाहतुकीला खड्यामुळे अडथळे निर्माण होत आहेत. हा मार्ग जिल्ह्यातील प्रमुख मार्ग असल्याने या मार्गावरून सतत वाहने धावत असतात. मात्र, खड्ड्यांमुळे या मार्गाची मोठी दुरवस्था झाली असल्याने खड्ड्यांत रस्ता की रस्त्यात खड्डे हे कळायला मार्ग नाही. खड्ड्यांत अनेक ठिकाणी गाड्या फसतात, आजारी नागरिकाला नेता येत नाही. खड्ड्यांमुळे अनेक लोकांच्या कारचे टायर फुटले आहेत. अनेक ठिकाणी लहानमोठे अपघातही या मार्गावर घडत आहेत.

पावसाळ्यापूर्वी सदर मार्गाची दुरुस्ती करणे गरजेचे होते. परंतु, राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले. रस्त्याच्या कडेला नाल्यांची सफाई केली नाही, अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे रस्त्यावरून पाणीही वाहत असते. सदर मार्गावरील डांबर उखडून जात आहे. ठाणेगाव, वैरागड फाट्यापासून १०० मीटरवर रस्त्याची अतिशय दुर्दशा झाली आहे. तसेच आरमोरी गाढवी नदी परिसरात सुद्धा मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे सदर मार्ग हा वाहनधारकांसाठी धोकादायक ठरत आहे. 

रस्ता खोदून पाईप टाकल्याने अपघातआरमोरी मार्गावरील खरपुंडी नाका, वसा जवळील कोलांडी नाला, देऊळगाव खोब्रागडी नदी ते डोंगरसावंगी रस्ता, डोंगरगाव जवळ इरिगेशनने रस्ता खोदून पाईप टाकले. त्यामुळे पावसाळ्यात एक मीटर खड़ा पडला. यात कार शिरल्याची घटना घडली होती. रस्ता खोदून पाईप टाकल्याने अपघाताच्या घटना अलीकडे वाढल्या आहेत.

खासदारांनी केल्या अधिकाऱ्यांना सूचनाआरमोरी-गडचिरोली या मार्गाची खड्यांमुळे ठिकठिकाणी दुर्दशा झाली आहे. सदर बाबीकडे वाहनधारकांनी खा.डॉ. नामदेव किरसान यांचे लक्ष वेधले. रविवारी त्यांनी महामार्ग प्रशासनाला सूचना करून रस्त्याची पाहणी करून तात्काळ दुरुस्ती करावी, अशा सूचना अधिकाऱ्यांना केल्या.

मार्ग दुरुस्तीची मागणीराष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण प्रशासनाने आरमोरी- गडचिरोली राष्ट्रीय महामार्गाची दुरुस्ती करून, वाहतूक सुरळीत करावी अशी मागणी ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉइज फेडरेशनचे अध्यक्ष माधव गावड यांनी केली आहे. याबाबत त्यांनी अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. 

टॅग्स :road transportरस्ते वाहतूकGadchiroliगडचिरोली