शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा हेच नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये चालले होते, मी त्यांना ठाकरेंच्या सांगण्यावरून रोखलं", राजन विचारेंचा धक्कादायक दावा
2
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
3
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
4
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
5
‘राहुल गांधी ग्रेट पॉलिटिकल सायंटिस्ट’! हिमंता बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल, पण असं का म्हणाले?
6
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
7
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
8
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
9
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
10
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
11
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
12
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
13
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
14
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
15
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
16
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
17
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
18
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
19
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
20
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार

आरमोरी नगर परिषदेचे अस्तित्व वांद्यात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2018 12:11 AM

अडथळ्यांची शर्यत पार करीत असलेल्या प्रस्तावित आरमोरी नगर परिषदेसमोरील अडचणी अजूनही संपलेल्या नाहीत. अरसोडा ग्रामपंचायतने या नगर परिषदेत समाविष्ठ होण्यास नकार दिल्यामुळे २५ हजार लोकसंख्येचा निकष कसा पूर्ण करायचा? असा प्रश्न उभा ठाकला आहे.

ठळक मुद्देअरसोडामुळे अडचण : लोकसंख्येचा निकषाची अडचण

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : अडथळ्यांची शर्यत पार करीत असलेल्या प्रस्तावित आरमोरी नगर परिषदेसमोरील अडचणी अजूनही संपलेल्या नाहीत. अरसोडा ग्रामपंचायतने या नगर परिषदेत समाविष्ठ होण्यास नकार दिल्यामुळे २५ हजार लोकसंख्येचा निकष कसा पूर्ण करायचा? असा प्रश्न उभा ठाकला आहे.आरमोरीला नगर पंचायतऐवजी नगर परिषदेचा दर्जा द्यावा अशी मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठात दाखल झाली होती. ती याचिका निकाली काढताना आॅगस्ट २०१७ मध्ये न्यायालयाने याबाबतचा निर्णय चार आठवड्यात राज्य शासनाने घ्यावा असे आदेश दिले होते. त्यानुसार १२ सप्टेंबर २०१७ रोजी आरमोरी नगर परिषदेची अधिसूचना जारी केली. यावेळी आरमोरी (लोकसंख्या १८,५०४), शेगाव (३८४२), अरसोडा (२६२१) आणि पालोरा (५४०) या चार गावांना नगर परिषदेत सामावून घेण्याचे जाहीर केले. याचवेळी संबंधित ग्रा.पं.च्या काही हरकती असतील तर त्यांनी आपले आक्षेप जिल्हाधिकाºयांकडे सादर करण्यास सांगितले. त्यानुसार अरसोडा ग्रामपंचायतने आक्षेप घेतला होता. सोबतच आरमोरी नगर परिषदेत समाविष्ठ होण्यास नकार देणारा ठराव घेऊन तो जिल्हाधिकाºयांकडे सादर केला. जिल्हाधिकाºयांनी तो ठराव राज्य शासनाकडे पाठविला. जिल्हा परिषदेच्या नुकत्याच झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीतही अरसोडा ग्रामपंचायतचा हा ठराव शासनाकडे पाठविण्याचे ठरले. त्यामुळे शासन आता काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.- तर २०२१ च्या जनगणनेची प्रतीक्षाकोणतीही नगर परिषद अस्तित्वात येण्यासाठी त्या गावाची लोकसंख्या किमान २५ हजार असावी अशी अट आहे. २०११ च्या जनगणनेनुसार आरमोरीची लोकसंख्या १८ हजार ५०४ तर शेगाव आणि पालोरा मिळून एकूण लोकसंख्या २२ हजार ८८६ इतकी होते. त्यामुळे अरसोड्याला वगळून नगर परिषद जाहीर करताना लोकसंख्येचा निकष कसा पूर्ण करणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे. जर तसे झाल्यास २०२१ मध्ये होणाºया जनगणेची प्रतीक्षा करून नंतर वाढीव लोकसंख्या जाहीर होईपर्यंत आरमोरीवासीयांना प्रतीक्षा करावी लागणार आहे.