गडचिरोली : शिक्षकांच्या समायोजनांची प्रक्रिया १ जुलैपासून राबविण्यात येणार आहे. जिल्हा परिषद शाळांमध्ये कार्यरत असलेल्या शिक्षकांपैकी १२५ शिक्षक बीएड पदवीधारक आहेत. ते १ ते ४ च्या वर्गावर प्राथमिक शिक्षक म्हणून अध्यापन करीत आहेत. या शिक्षकांना ६ ते ८ या वर्गावर पदवीधर शिक्षक म्हणून नियुक्ती करावी, अशी मागणी होत आहे. राज्यभरातील इतर जिल्हा परिषदांनी अशा पद्धतीने पदवीधर शिक्षकांचे समायोजन केले आहेत. मागील १२ वर्षापासून जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक एम.ए., बी.एड ही पदवी प्राप्त केली आहे. मात्र त्यांना अजूनही प्राथमिक शिक्षक म्हणूनच काम करावे लागत आहे. शिक्षण हक्क कायद्यानुसार ६ ते ८ या वर्गासाठी तीन पदवीधर शिक्षक आवश्यक आहेत. या नियमानुसार पदे भरल्यास बी.एड धारकांचे समायोजन करणे सहज शक्य होणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढण्यास मदत होणार आहे व शिक्षकांमधीलही आपल्यावर अन्याय झाल्याची भावना दूर होण्यास मदत होईल. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संपदा मेहता यांनी याबाबीकडे गांभीर्याने लक्ष घालून पदवीधर शिक्षकांची नेमणूक करावी, अशी मागणी होत आहे.
पदवीधर शिक्षकपदी नियुक्ती करा
By admin | Updated: June 28, 2014 00:49 IST