शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

गडचिरोलीत काँग्रेसला आणखी एक धक्का; माजी आमदार नामदेव उसेंडी यांचा राजीनामा

By संजय तिपाले | Updated: March 26, 2024 14:11 IST

तिकीट वाटपासाठी पैशांचा निकष: कार्यकर्त्यांशी चर्चा करून पुढील निर्णय 

गडचिरोली : लोकसभा उमेदवारीवरून काँग्रेसमध्ये नाराजीनाट्य उफाळून आले आहे. डॉ. चंदा व डॉ. नितीन कोडवते यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर आता माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी यांनी बंडाचा झेंडा फडकावला आहे. त्यामुळे येथे काँग्रेसला दुसरा धक्का बसला आहे. काँग्रेसने डॉ. नामदेव किरसान यांना उमेदवारी जाहीर केल्याने नाराज असलेले डॉ. उसेंडी यांनी काँगेस नेत्यांवर गंभीर आरोप केला आहे. तिकीट वाटपासाठी पक्षात पैशांचा निकष लावल्याचा दावा त्यांनी २६ मार्च रोजी केला आहे. 

डॉ. नामदेव उसेंडी यांनी काँगेस आदिवासी प्रदेशाध्याक्षपदाचा राजीनामा दिला आहे. प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा अद्याप दिला नसून कार्यकर्त्यांशी चर्चा करून पुढील निर्णय घेणार असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बंडोपंत मल्लेलवार, संदीप सुरजागडे आदी उपस्थित होते. डॉ. उसेंडी हे २००९ मध्ये काँग्रेसकडून गडचिरोली विधानसभा मतदासंघांतून निवडून आले होते. त्यानंतर २०१४ व २०१९ अशा दोन्ही वेळी त्यांनी लोकसभा निवडणुकीत नशीब आजमावले, पण त्यांना यश आले नाही.

दरम्यान, तिसऱ्यांदा ते काँग्रेसकडून इच्छुक होते, पण त्यांना डावलून प्रदेश महासचिव डॉ. नामदेव किरसान यांना संधी देण्यात आली. त्यामुळे नाराज असलेले डॉ. उसेंडी यांनी काँगेस आदिवासी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांनी काँग्रेसच्या  प्रदेश पातळीवरील नेत्यांवर गंभीर आरोप केले. पैशांच्या जोरावर उमेदवारी वाटप केली जात असल्याची आपल्याला शंका असल्याचा आरोप त्यांनी केला. दोन वरिष्ठ नेत्यांच्या गटबाजीत कुरघोडीच्या राजकारणातून आपल्याला डावलले गेले, असे ते म्हणाले. कामाचा व्याप वाढल्याने त्यांनी पदाचा राजीनामा दिला असावा. त्यांचे आरोप प्रदेश पातळीवरील नेत्यांवर आहेत, तेच उत्तर देतील. - महेंद्र ब्राम्हणवाडे, जिल्हाध्यक्ष काँगेस

टॅग्स :congressकाँग्रेस