शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
4
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
5
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
6
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
7
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
8
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
9
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
10
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
11
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
13
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
14
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
15
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
16
आयोग नव्हे, मतदारच राजा !
17
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
18
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
19
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
20
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश

नक्षल्यांच्या आणखी एका कॅम्पचा पर्दाफाश

By संजय तिपाले | Updated: June 7, 2024 19:00 IST

छत्तीसगड सीमेवर जवानांची कारवाई : मोठ्या प्रमाणात साहित्य जप्त

संजय तिपाले /गडचिरोलीगडचिरोली : छत्तीसगडच्या  सीमेवर सावरगावजवळ कुलभट्टी जंगलातील डोंगरावर नक्षल्यांचा तळ उध्दवस्थ केल्याच्या कारवाईला २४ तासही होत नाहीत तोच छत्तीसगड सीमेलगतच्या गॅरापत्ती पोलिस ठाण्यापासून चार किलोमीटर अंतरावर आणखी एका नक्षली तळाचा जवानांनी पर्दाफाश केला. ७ जून रोजी ही कारवाई केली.

छत्तीसगड सीमेलगतच्या गॅरापत्तीजवळील कसनसूर - चातगाव, टिपागड, दलम, छत्तीसगडच्या मोहल्ला मानपूर व औंधी दलमचे काही सशस्त्र माओवादी हे गॅरापत्तीजवळील भिमनखोजी, नारकसा   जंगल परिसरात घातपात घडविण्याच्या उद्देशाने एकत्रित आल्याची माहिती सुरक्षा यंत्रणा होती. त्यानुसार पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी कारवाईचे आदेश दिले. अपर  अधीक्षक (प्रशासन)   कुमार चिंता यांच्या नेतृत्वाखाली विशेष अभियान पथक  व पोस्टे गॅरापत्ती तसेच सीआरपीएफ ११३ बटालिन अ कंपनीच्या जवानांनी सदर जंगल परिसरात लगेच माओवादविरोधी अभियान राबवित होते.  

भिमनखोजी जंगल परिसरात शोध मोहिम राबवित़ पुढे जात असतांना, अंदाजे तीन वाजताच्या  दरम्यान माओवाद विरोधी अभियान पथकातील पहिल्या ग्रुपमधील जवानांना माओवाद्यांचा कॅम्प दिसून आला. सदर कॅम्पच्या दिशेने सुरक्षिततेची काळजी घेत पुढे जात असताना पोलिस आल्याचा सुगावा लागल्याने माओवाद्यांनी कॅम्पमधील सर्व साहित्य सोडून पहाडी व घनदाट जंगलाचा फायदा घेत अगोदरच पळ काढला

माओवाद्यांच्या कॅम्पच्या ठिकाणी जाऊन शोध अभियान राबविले असता १ सोलार प्लेट २, पँट,  ३ चप्पल जोड, ३ ताडपत्री २ प्लास्टि बेल्ट, शाल, दुपट्टे, बेडशिट, लायटर, गंज, मेडिकल कीट, पाणी कॅन, कात्री असे विविध साहित्य आढळले. ते जप्त केले असून अधिक तपास सुरु आहे.

 पोलिसांना पाहून पलायनदरम्यान, जवानांना पाहून नक्षल्यांनी साहित्य ठेऊन तेथून पळ काढला. विशेष अभियान पथकाची सर्व पथके   गडचिरोलीला सुखरूप पोहोचले आहेत. छत्तीसगड सीमेवर माओवादविरोधी कारवाया तीव्र करण्यात आल्या आहेत. जवानांना कुइलीही हानी पोहोचली नाही, असे पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी सांगितले.

टॅग्स :naxaliteनक्षलवादीGadchiroliगडचिरोलीCrime Newsगुन्हेगारी