शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Blast: २ वर्षांपासून सुरू होता स्फोटकं जमवण्याचा जीवघेणा खेळ; डॉ शाहीन शाहिदची कबुली
2
प्रशांत किशोर यांची भविष्यवाणी खरी होणार? बिहार निवडणुकीच्या एक्झिट पोलने केले शिक्कामोर्तब!
3
रेखा झुनझुनवालांच्या पोर्टफोलिओतील पेनी स्टॉकची पुन्हा भरारी! ६ महिन्यात तोटा भरुन काढत ३४ टक्के वाढ
4
जपानचे १,००,००० येन भारतामध्ये किती रुपये होतात? तुम्हाला फायदा होतो की नुकसान, जाणून घ्या
5
सीमेपासून अवघ्या २० किमी अंतरावर नवं आव्हान?; बांगलादेश सैन्यानं भारताला दिलेला शब्द मोडला
6
Tata घराण्यात मोठा बदल, नोएल टाटांच्या मुलाला मिळाली मोठी जबाबदारी; परदेशातून घेतलंय शिक्षण
7
एके-47 ठेवणाऱ्या डॉ. शाहीनचे थेट महाराष्ट्राशी कनेक्शन; जैशच्या महिला विंगची निघाली मास्टरमाईंड
8
“जनतेची काम करतो म्हणून प्रत्येक समाज घटक ८-८ लाखाच्या फरकाने निवडून देतात”: अजित पवार
9
दिल्लीतील स्फोटामुळे 'कॉकटेल २'चं शूट पुढे ढकललं, आजपासूनच होणार होती सुरुवात
10
एकही रुपया न गुंतवता दरवर्षी कमावू शकता ₹२.८८ लाख; पाहा PPF च सीक्रेट, लोकही विचारतील कसं केलं?
11
धर्मेंद्र यांना रुग्णालयातून डिस्चार्ज; सनी देओलच्या टीमने दिलं स्टेटमेंट, 'त्यांचं तुमच्यावर..."
12
Govinda Hospitalised : ६१ वर्षीय गोविंदाची अचानक तब्येत बिघडली, झाला बेशुद्ध, जुहूच्या रुग्णालयात दाखल
13
ATP Finals 2025: खेळ पाहण्यासाठी आलेल्या दोन चाहत्यांचा मृत्यू, क्रीडाविश्वात शोक!
14
इंजिनीअरिंग, फार्मसी, एमबीएची सीईटी वर्षातून दोनदा, यंदा एप्रिलमध्ये पहिली, तर मेमध्ये दुसरी सीईटी परीक्षा
15
महायुतीच्या त्सुनामीमुळे विरोधकांत भीती, आशिष शेलार यांचा टोला
16
आजचे राशीभविष्य, १२ नोव्हेंबर २०२५: आजचा दिवस आनंदी; पण 'या' राशीला स्त्रीमुळे अडचणीचा धोका
17
पोस्टरमुळे समोर आला डॉक्टरांचा दहशतवादी कट; स्फोटकांचा तपास यशस्वी, पण दिल्लीत कशी झाली चूक?
18
Delhi Blast: दिल्ली बॉम्बस्फोटावर पाकिस्ताननं काय म्हटलं? तुर्कीनं तर हद्द ओलांडली!
19
Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज, डॉक्टरांनी दिले हेल्थ अपडेट
20
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश

अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा चक्काजाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2019 01:30 IST

महाराष्ट्र राज्य अंगणवाडी, बालवाडी कर्मचारी युनियन (आयटक)च्या वतीने गडचिरोली शहरातील इंदिरा गांधी चौकात बुधवारी दुपारी २ वाजता चक्काजाम आंदोलन करण्यात आले. यामुळे वाहतूक ठप्प पडली होती. या आंदोलनात शेकडो अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पोलिसांनी स्थानबद्ध केले. जिल्हाभरातील अंगणवाडी कर्मचारी सर्वप्रथम पोटेगाव मार्गावरील गोंडवाना कला दालनात जमा झाल्या.

ठळक मुद्देशेकडोंना केले स्थानबद्ध : विविध मागण्यांसाठी इंदिरा गांधी चौकात आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : महाराष्ट्र राज्य अंगणवाडी, बालवाडी कर्मचारी युनियन (आयटक)च्या वतीने गडचिरोली शहरातील इंदिरा गांधी चौकात बुधवारी दुपारी २ वाजता चक्काजाम आंदोलन करण्यात आले. यामुळे वाहतूक ठप्प पडली होती. या आंदोलनात शेकडो अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पोलिसांनी स्थानबद्ध केले.जिल्हाभरातील अंगणवाडी कर्मचारी सर्वप्रथम पोटेगाव मार्गावरील गोंडवाना कला दालनात जमा झाल्या. त्यानंतर इंदिरा गांधी चौकापर्यंत मोर्चा काढण्यात आला. इंदिरा गांधी चौकात काही वेळ चक्काजाम आंदोलन केले. आंदोलनात जवळपास ८०० अंगणवाडी महिला कर्मचारी सहभागी झाल्या होत्या. सरकार विरोधात घोषणांनी परिसर दणाणून गेला. चारही मार्गावरची वाहतूक काही काळासाठी ठप्प पडली होती. त्यानंतर पोलिसांनी अंगणवाडी कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी व अंगणवाडी कर्मचाºयांना स्थानबध्द केले. सर्व अंगणवाडी महिलांना पोलीस स्टेशनमध्ये जमा झाल्या. जवळपास ८०० अंगणवाडी कर्मचारी पोलीस स्टेशनच्या आवारात जमा झाल्याने पोलीस स्टेशनमध्ये गर्दी झाली होती.आंदोलनाचे नेतृत्व आयटकचे जिल्हा संघटक देवराव चवळे, विनोद झोडगे, माजी जि.प. सदस्य अमोल मारकवार, डॉ. महेश कोपुलवार, सिटूचे अध्यक्ष रमेशचंद्र दहिवडे, राधा ठाकरे, जगदिश मेश्राम, मिनाक्षी झोडे, बसंती अंबादे, दुर्गा कुर्वे, अनिता अधिकारी, मिरा कुरंजेकर, रेखा जांभुळे, कौशल्या गोंधोळे, जहरा शेख, ज्योती कोमलवार, रूपा पेंदाम, शिवलता बावणथडे यांनी केले. काही वेळानंतर सर्व अंगणवाडी कर्मचाºयांची सुटका करण्यात आली. अंगणवाडी कर्मचाºयांच्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन करण्यात आले आहे. मागण्या मान्य न झाल्यास यापुढे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. गडचिरोली पोलीस स्टेशनचे ठाणेदार दीपरत्न गायकवाड यांच्या नेतृत्वात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यामुळे कोणतीही अनुचित घटना घडली नाही.महामार्गाच्या कामामुळे रस्ता झाला जामइंदिरा गांधी चौकातून धानोरा मार्गावर एका बाजूच्या रस्त्याचे खोदकाम केले असल्यामुळे एकाच बाजुने वाहतूक सुरू आहे. अंगणवाडी कर्मचाºयांच्या या मोर्चामुळे या मार्गाने जाणाºया-येणाºया वाहनांची चांगलीच कोंडी झाली होती. रुग्णवाहिकेसारख्या आकस्मिक सेवेतील वाहनांनाही याचा फटका बसला. भविष्यात हे टाळण्यासाठी या रस्त्याचे काम सुरू आहे तोपर्यंत या मार्गाने मोर्चा किंवा अन्य आंदोलनांना परवानगी देऊ नये, अशा प्रतिक्रिया नागरिकांमध्ये उमटत होत्या.

टॅग्स :Chakka jamचक्काजाम