शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

आणि सर्व शिक्षकांनी एकाच दिवशी मारली शाळेला दांडी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2021 18:34 IST

कुरखेडा तालुक्यातील घाटी येथील जि.प. शाळेतील सर्व शिक्षक एकाच दिवशी शाळेत गैरहजर राहिले त्यामुळे संपूर्ण शाळा बंद ठेवावी लागली. शिक्षकांच्या या व्यवहाराबद्दल पालकांनी संताप व्यक्त करून कारवाईची मागणी केली आहे.

ठळक मुद्देघाटी येथी प्रकार : गावकऱ्यांनी व्यक्त केला संताप

गडचिरोली : कुरखेडा तालुक्यातील घाटी येथील जि.प. उच्च प्राथमिक शाळेत गुरुवारी एकही शिक्षक कर्तव्यावर हजर न झाल्याने संपूर्ण शाळा बंद ठेवावी लागली. शिक्षकांच्या या भाेंगळ कर्तव्यावर पालकांनी संताप व्यक्त करून शिक्षकांवर कारवाई करावी, अशी मागणी पंचायत समितीकडे केली आहे.

घाटी जि. प. उच्च प्राथमिक शाळेत इयत्ता पहिली ते चवथीपर्यंत वर्ग आहेत. चार वर्गांसाठी ३ शिक्षक कार्यरत आहेत. मात्र या शाळेवर शिक्षण विभागाचे नियंत्रण नसल्याने शिक्षक नियमित हजर राहत नाही. गुरुवारी तर येथील तिन्ही शिक्षक एकाच वेळी गैरहजर राहिल्याने शाळाच बंद राहण्याची नामुष्की ओढवली.

शिक्षक शाळेत गैरहजर असल्याची माहिती सरपंच, उपसरपंचासह शाळा समितीचे पदाधिकारी व गावकऱ्यांना मिळाली. सर्वांनी दुपारी १२.१५ वाजता भेटी दिली. दरम्यान, एकही शिक्षक उपस्थित नसल्याचे आढळून आले. पदाधिकाऱ्यांनी संताप व्यक्त करून पंचायत समितीकडे याबाबत तक्रार केली. यावेळी शाळा समिती अध्यक्ष वैशाली गहाणे, उपाध्यक्ष कानू भोयर, तंटामुक्त समिती अध्यक्ष देवराव ठलाल, पोलीस पाटील सुरेश टेकाम, उपसरपंच फाल्गुन फुले, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य फाल्गुन मेश्राम, यादव मानकर, नवनाथ कोटनाके, दीपक भोयर, प्रकाश ठाकूर, कुमार शिंदे, प्रफुल बावणे, हिराजी मानकर, अमोल मेश्राम उपस्थित होते.

मुख्यालयाची सक्ती करा

घाटी येथील शिक्षक शाळेत नियमित उपस्थित राहत नाही. वारंवार गैरहजर राहतात. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान हाेत आहे. शाळेतील तिन्ही शिक्षकांना मुख्यालयाची सक्ती करून कार्यालयीन वेळेत शाळेत उपस्थित राहण्याचे निर्देश द्यावे, तसेच येथील एका शिक्षकाचे रिक्त असलेले पद लवकर भरून विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्वक शिक्षण द्यावे, अशी मागणी पालकांनी पंचायत समितीकडे तक्रारीद्वारे केली आहे.

टॅग्स :SchoolशाळाEducationशिक्षणStudentविद्यार्थी