गडचिराेली : काैंटुंबिक, किरकाेळ भांडण व इतर विविध कारणांमुळे वृद्ध आजी-आजाेबा तसेच नागरिकांना पर्याय नाही म्हणून वृद्धाश्रमात राहावे लागत आहे. गडचिराेलीच्या माताेश्री वृद्धाश्रमातील वृद्ध निराधार आहेत. मात्र काेराेना संसर्गाच्या महामारीमुळे येथे येऊन भेट देणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. त्यांना वेगवेगळ्या स्वरूपात मिळणारी मदत बंद झाली असून, या वृद्धाश्रमातील ६ वृद्ध नागरिक एकाकी पडले आहेत.
येथील माताेश्री वृद्धाश्रमात चंद्रपूर व गडचिराेली या दाेन्ही जिल्ह्यांतील वृद्धांना प्रवेश दिला जाताे. या वृद्धाश्रमातील वृद्धांच्या पालनपाेषणासाठी संस्थेसह देणगीदारांचे सहकार्य लाभत असते. जवळपास २० देणगीदार मासिक वर्गणी देणारे असून या वर्गणीतून किराणा, भाजीपाला गॅस व इतर खर्च भागविला जाताे.
बाॅक्स ....
भेट देणारे शून्यावर
गडचिराेली शहरात विवेकानंदनगर परिसरात एकमेव माताेश्री वृद्धाश्रम आहे. या वृद्धाश्रमात अनेक सामाजिक कार्यकर्ते, राजकीय पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच इतर बरेच मान्यवर काेणत्या न काेणत्या निमित्ताने जाऊन वृद्धांची भेट घेत असतात.
महापुरुषांच्या जयंती किंवा स्वत:चे वाढदिवस राहिले की अनेक लाेक या वृद्धाश्रमात जाऊन या वृद्धांना कपडे, फळे, बिस्किटे व इतर वस्तू भेट देतात. आता काेराेना संसर्गाच्या भीतीने व संचारबंदीमुळे येथे भेट देणाऱ्यांची संख्या शून्यावरच पाेहाेचली असल्याचे दिसून येते.
बाॅक्स ...
भावना शून्यतेचा प्रत्यय
काेराेना महामारीमुळे आम्हाला येऊन भेटणाऱ्यांची संख्या घटली आहे. गेल्या काही दिवसांपासून कर्मचारी वगळता बाहेरील एकही जणांनी येऊन आमच्याशी चर्चा केली नाही. काेराेना संसर्ग व संचारबंदीमुळे काेणीही येऊन आमच्याशी संवाद साधत नसल्याने एकाकीपणाचा व भावना शून्यतेचा अनुभव येत असल्याचे येथील वृद्ध आजी-आजाेबांनी सांगितले.
बाॅक्स ...
कार्यक्रम झाले बंद
काेराेना महामारीमुळे येथील छाेटे-माेठे कार्यक्रम बंद झाले आहेत. वाढदिवस निमित्ताने येथे अनेक कार्यक्रम हाेत असतात. मात्र या कार्यक्रमाला पूर्णत: ब्रेक लागला आहे. परिस्थितीमुळे आम्हाला एकाकीपणाचे जीवन जगावे लागत आहे. त्यात नेहमी मिळणारा भावनिक आधार काेराेनामुळे संपला आहे. काेराेनाचे संकट दूर व्हावे, अशी अपेक्षा वृद्धांनी व्यक्त केली.