शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

गडचिरोली जिल्ह्यातील सर्व शाळा एकाच दिवशी होणार सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 18:07 IST

Gadchiroli : सीबीएसई व इंग्रजी माध्यमांच्या शाळांच्या मनमानीला शासनाच्या आदेशाने लगाम लागला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभाची तारीख राज्य शिक्षण विभागाने निश्चित केली असून विदर्भ विभागातील शाळा २३ जूनपासून सुरू होणार आहेत. २०२५-२६ या सत्रात जिल्ह्यातील सर्व शाळा एकाच दिवशी सुरू होणार आहेत. विशेष म्हणजे तापमान अधिक असल्याने २३ ते २८ जून या कालावधीत सहा दिवस शाळा सकाळच्या सत्रात भरणार आहेत.

राज्य शासनाच्या या निर्णयामुळे शैक्षणिक कामकाजात एकवाक्यता येणार आहे. शाळा सुरू होण्याच्या तारखा निश्चित झाल्यामुळे विद्यार्थी आणि पालकांमधील वेळापत्रकाबाबतची अनिश्चितता संपुष्टात आली आहे. विदर्भविभागातील शाळांचे पूर्णवेळ नियमित कामकाज ३० जूनपासून सुरू करण्यात येईल. संपूर्ण शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये किमान २३५ दिवसांचे कामकाज होणे बंधनकारक असल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे, याची नोंद सर्व शाळांना घ्यावी लागेल, असे शासनाने परिपत्रकात नमुद केले आहे. 

राज्य शिक्षण विभागाने जाहीर केलेले हे वेळापत्रक प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील सर्व शाळांना लागू आहे. यामध्ये शासकीय, जिल्हा परिषद, नगरपालिका संचालित शाळांसह सर्व अनुदानित व विनाअनुदानित शाळांचाही समावेश होतो. स्थानिक पातळीवर आवश्यकतेनुसार सुट्टया घेण्याची मुभा शाळांना देण्यात आली आहे, परंतु यासाठी संबंधित शिक्षणाधिकारी (माध्यमिक/प्राथमिक) यांची पूर्वपरवानगी घेणे अनिवार्य असेल. कोणत्याही परिस्थितीत एकूण कामाचे दिवस २३५ पेक्षा कमी होणार नाहीत, याची दक्षता घ्यावी लागणार आहे. 

पहिल्याच दिवशी गणवेश अन् पुस्तके येणार हातीशाळेच्या पहिल्या दिवशी नवागतांसह वर्ग पहिली ते आठवी पर्यंतच्या पात्र सर्व विद्यार्थ्यांना गणवेश व पाठ्यपुस्तके मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. जि. प. प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीने शाळास्तरावर पाठ्यपुस्तके यापुर्वीच पोहचविण्यात आली आहेत.

शाळा प्रवेशात्सवाची जोरदार तयारी

  • २३ जून रोजी शाळेच्या पहिल्या दिवशी शाळा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात करण्यात येणार आहे. याबाबत प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागाच्या वतीने नियोजन करण्यात आले आहे.
  • याबाबत गटशिक्षणाधिकारी, केंद्रप्रमुख, शिक्षण विस्तार अधिकारी व मुख्याध्यापकांच्या बैठका मे महिन्यात पार पडल्या. पुन्हा २० जूनपुर्वी नियोजनात्मक व तयारीच्या आढावा बैठका होतील.

"शासनाच्या निर्देशानूसार २०२५-२६ च्या शैक्षणिक सत्रात जिल्ह्यातील सर्व माध्यमाच्या, सर्व व्यवस्थापनाच्या शाळाएकाच दिवशी २३ जूनपासून भरविण्यात येणार आहेत. याबाबत कार्यालयाच्या वतीने पत्र काढण्यात येणार आहे."- वासुदेव भुसे, शिक्षणाधिकारी, माध्यमिक, गडचिरोली.

टॅग्स :GadchiroliगडचिरोलीSchoolशाळाSchool Reopening - GuideShalechi Taiyari