शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
2
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
3
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
4
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
5
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
6
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
7
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
8
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
9
Smriti Irani : "अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
10
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
11
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
12
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
13
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
14
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
15
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
16
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
17
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
18
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
19
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
20
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका

करवाढीविरोधात आरमोरी नगर परिषदेवर सर्वपक्षीय आक्षेप मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2020 5:00 AM

नवी करवाढ रद्द करण्यासह आरमोरी शहरात बंद पडलेली रोजगार हमीची कामे पूर्ववत सुरू करण्यात यावी, दररोज नियमित शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात यावा. मागेल त्याला नळ कनेक्शन देण्यात यावे, कोणतेही प्रमाणपत्र किंवा दाखले एकाच दिवशी देण्यात यावे, आरमोरी शहराच्या विकासाच्या नावावर शहरातील मजबूत रस्ते व नाल्या तोडून नव्याने बांधण्याचा ठेकेदारी निर्णय घेऊ नये, शहराच्या विकासासाठी मिळालेला पैसा व्यर्थ खर्च करू नये अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या.

ठळक मुद्देजुनी कर प्रणाली कायम ठेवण्याची मागणी; विविध मागण्यांचे निवेदन

  लोकमत न्यूज नेटवर्कआरमोरी : नगर परिषदेने नव्याने केलेली कर आकारणी आणि करवाढ रद्द करून जुनीच करप्रणाली कायम ठेवण्यात यावी या मागणीसाठी सर्वपक्षीय  आक्षेप मोर्चा बुधवारी आरमोरी नगरपरिषदेवर धडकला.मोर्चाची सुरूवात जिवानी राईस मिलपासून करण्यात आली. सदर मोर्चा शहरातील मुख्य मार्गाने  निघून आझाद चौक, गायकवाड चौक ते  गांधी चौक गुजरीमार्गे  मुख्य चौकातून नगरपरिषदेवर धडकला. मोर्चाचे नेतृत्व काँग्रेसचे माजी आमदार आनंदराव गेडाम, हरिराम वरखडे,  शिवसेनेचे माजी आमदार डॉ.रामकृष्ण मडावी. राष्ट्रवादीचे आरमोरी विधानसभा अध्यक्ष शरद सोनकुसरे, भाकपचे जिल्हा सचिव डॉ.महेश कोपूलवार, माकपचे अमोल मारकवार, प्रहारचे निखिल धार्मिक यांनी व इतर पदाधिकाऱ्यांनी  केले. नवी करवाढ रद्द करण्यासह आरमोरी शहरात बंद पडलेली रोजगार हमीची कामे पूर्ववत सुरू करण्यात यावी, दररोज नियमित शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात यावा. मागेल त्याला नळ कनेक्शन देण्यात यावे, कोणतेही प्रमाणपत्र किंवा दाखले एकाच दिवशी देण्यात यावे, आरमोरी शहराच्या विकासाच्या नावावर शहरातील मजबूत रस्ते व नाल्या तोडून नव्याने बांधण्याचा ठेकेदारी निर्णय घेऊ नये, शहराच्या विकासासाठी मिळालेला पैसा व्यर्थ खर्च करू नये अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या.मोर्चा नगरपरिषदेवर पोहचल्यानंतर मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. मोर्चेकरांचे निवेदन नगराध्यक्ष पवन नारनवरे, उपाध्यक्ष हैदरभाई पंजवाणी  व मुख्याधिकारी माधुरी सलामे यांनी  मुख्य प्रवेशद्वाराबाहेर येऊन स्विकारले. सर्वपक्षीय  शिष्टमंडळाने न.प.चे पदाधिकारी व मुख्याधिकाऱ्यांसोबत चर्चा केली.या मोर्चात पीरिपा, प्रहार जनशक्ती पार्टी, वंचित बहुजन आघाडी, आम आदमी पार्टी आणि युवारंग  संघटनेचे पदाधिकारीही सहभागी झाले होते.मोर्चात संदीप ठाकूर, अमीन लालानी, निखिल धार्मिक,  राजू गारोदे,  सुदाम मोटवानी, अशोक वाकडे, नगरसेवक मिलींद खोब्रागडे, नगरसेविका दुर्गा लोणारे, चंदू वडपल्लीवार, वेणूताई ढवगाये, राजू अंबानी,   देवराव चवळे, विनोद झोडगे,  अड. जगदीश मेश्राम,  प्रशांत सोमकुवर, भिमराव ढवळे, प्रकाश खोब्रागडे, कल्पना तिजारे, मेघा मने आदी अनेक जण प्रामुख्याने सहभागी झाले होते.

टॅग्स :Morchaमोर्चाTaxकर