अंकिसा माल येथे दारू व तंबाखू नष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 04:24 IST2021-01-01T04:24:56+5:302021-01-01T04:24:56+5:30

सध्या जिल्हाभरात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. निवडून येण्यासाठी उमेदवार दारू किंवा पैशाचे आमिष दाखविण्याची शक्यता आहे. आपण दारूच्या ...

Alcohol and tobacco destroyed at Ankisa Mall | अंकिसा माल येथे दारू व तंबाखू नष्ट

अंकिसा माल येथे दारू व तंबाखू नष्ट

सध्या जिल्हाभरात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. निवडून येण्यासाठी उमेदवार दारू किंवा पैशाचे आमिष दाखविण्याची शक्यता आहे. आपण दारूच्या नशेत राहून अयोग्य उमेदवाराची निवड केल्यास गावाचे नुकसान होईल. हे टाळण्यासाठी ‘दारूमुक्त निवडणूक’ महत्त्वाची आहे. गावात दारू विक्री सुरू असून निवडणुकीच्या काळात दारूला मत विकले जाऊ शकते. त्यामुळे दारूमुक्त निवडणूक करण्यासाठी गाव संघटनेच्या महिला व युवकांनी नियोजन करीत अहिंसक कृती करण्याचे ठरविले. त्यानुसार गावातील १० अवैध दारू विक्रेत्यांच्या घरांची व एका दुकानाची पाहणी केली. यावेळी एकूण ८० लिटर साखरेची दारू व दोन हजार रुपये किमतीचा तंबाखू जप्त करण्यात आला. गावातील मुख्य चौकात संपूर्ण मालाची होळी करीत पुन्हा दारू व तंबाखू विक्री न करण्याचे आवाहन करण्यात आले.

Web Title: Alcohol and tobacco destroyed at Ankisa Mall