शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

दारू-तंबाखूमुक्ती महिलांमुळेच शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2020 06:00 IST

मुक्तिपथ तालुका कार्यालयाच्या वतीने चामोर्शी येथील नगर पंचायत सभागृहात शनिवारी व्यसनमुक्ती संमेलन घेण्यात आले. यावेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून मुक्तिपथचे संचालक डॉ. मयूर गुप्ता, उपसंचालक संतोष सावळकर, पंचायत समिती सदस्य उषाताई सातपुते, पोलीस निरीक्षक जितेंद्र बोरकर आदी उपस्थित होते.

ठळक मुद्देडॉ.अभय बंग यांचे प्रतिपादन : चामोर्शी येथे तालुकास्तरीय व्यसनमुक्ती संमेलन

लोकमत न्यूज नेटवर्कचामोर्शी : जिल्ह्यातील दारूबंदीसाठी १९८७ पासून सुरू झालेल्या आंदोलनात चामोर्शी तालुका सुरुवातीपासूनच सक्रिय होता. कारण येथील लोकांना दारूबंदी हवी होती. महिलांचा या आंदोलनात पुढाकार होता. त्यामुळे शासनावर दबाव वाढून १९९३ पासून गडचिरोली जिल्ह्यात शासकीय दारूबंदी लागू झाली. तीन वर्षांपूर्वी जिल्ह्यात सुरू झालेल्या मुक्तिपथ अभियानाने या दारूबंदीला बळ दिले. या अभियानात सहभागी झालेल्या चामोर्शी तालुक्यातील महिला दारूबंदीसाठी संघर्ष करीत आहेत. तब्बल ८९ गावांतील महिलांनी विक्री बंद केली आहे. त्यामुळे आमचा पद्मश्री पुरस्कार अशाच धाडसी महिलांचा व गाव संघटनांचा आहे, असे प्रतिपादन मुक्तिपथ अभियानाचे संस्थापक डॉ.अभय बंग यांनी केले.मुक्तिपथ तालुका कार्यालयाच्या वतीने चामोर्शी येथील नगर पंचायत सभागृहात शनिवारी व्यसनमुक्ती संमेलन घेण्यात आले. यावेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून मुक्तिपथचे संचालक डॉ. मयूर गुप्ता, उपसंचालक संतोष सावळकर, पंचायत समिती सदस्य उषाताई सातपुते, पोलीस निरीक्षक जितेंद्र बोरकर आदी उपस्थित होते.डॉ. अभय बंग म्हणाले, राज्यातच नाही तर देशातही स्त्रियांवरील अत्याचाराच्या घटना आपण वारंवार ऐकतो. या घटनांमध्ये एक साम्य आढळते. हिंसा करताना आरोपी हा दारूच्या नशेत असल्याचे निदर्शनास येते. त्यामुळे हे हिंसाचार थांबवायचे असेल तर दारुला नाही म्हणणे आवश्यक आहे. चामोर्शी तालुक्याच्या ८९ गावांनी ही हिम्मत दाखवली आहे. यामध्ये त्यांचा संघर्ष, दारूबंदीसाठी असलेली तळमळ या सर्व गोष्टी महत्वाच्या ठरतात. त्यामुळे ही गावे आणि येथील महिला व पुरुष अभिनंदनास पात्र आहेत, असे बंग म्हणाले. चामोर्शी तालुका संघटक आनंद इंगळे, उपसंघटक रूपेश अंबादे, प्रेरक विनायक कुनघाडकर, जितेंद्र कुनघाडकर यांनी संपूर्ण संमेलनाचे यशस्वी नियोजन केले.७२ गावांतील ३३७ महिला व पुरुष यावेळी उपस्थित होते.खºर्याचे भूत उतरवणे गरजेचेदारूबंदीसाठी गावागावातील महिलांचा संघर्ष सुरूच आहे. पण खर्रा या पदार्थाचे व्यसन सर्वांच्या मानगुटीवर बसलेले आहे. पुरुषांसोबतच स्त्रिया आणि लहान मुलेही या व्यसनाच्या आहारी जात आहेत. यातून पानठेलाधारकांचे घर भरते पण या बदल्यात जिल्ह्यातील लोकांना तोंडाचा कॅन्सर, लकवा, रक्तदाब असे आजार मिळतात. खर्रा या विषारी पदार्थाचे भूत उतरवून त्याची सवय सोडणे गरजेचे आहे असे डॉ. बंग म्हणाले.यात्रा तंबाखूमुक्त करूविदर्भाची काशी म्हणून प्रसिद्ध असलेले मार्र्कंडादेव मंदिर चामोर्शी तालुक्यात आहे. गेल्या तीन वर्षांपासून ही जत्रा मुक्तिपथ, मार्र्कंडा येथील गावकरी, ग्रामपंचायत आणि पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने दारू आणि तंबाखूमुक्त केली आहे. यंदाही ही यात्रा दारू व तंबाखूमुक्त करायची असल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :liquor banदारूबंदी