शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अहेरीत नगराध्यक्षा-मुख्याधिकारी वाद पोलिसांत; जातिवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2023 16:35 IST

नगराध्यक्षा रोजा करपत व मुख्याधिकारी दिनकर खोत यांच्यात गेल्या काही दिवसांपासून धुसफूस सुरू होती

अहेरी (गडचिरोली) : येथे नगराध्यक्षा रोजा करपत व प्रभारी मुख्याधिकारी दिनकर खोत यांच्यात ५ एप्रिल रोजी कडाक्याचा वाद झाला. त्यानंतर नगराध्यक्षा रोजा करपत यांनी पोलिस ठाण्यात तक्रार देऊन मुख्याधिकाऱ्यांनी जातिवाचक शिवीगाळ केल्याने ॲट्रॉसिटीनुसार गुन्हा नोंद करण्याची मागणी केली.

नगराध्यक्षा रोजा करपत व मुख्याधिकारी दिनकर खोत यांच्यात गेल्या काही दिवसांपासून धुसफूस सुरू होती. या वादाने ५ एप्रिल रोजी टोकाचे वळण घेतले. ५ एप्रिल रोजी एका कामासाठी नगराध्यक्षांनी मुख्याधिकाऱ्यांना आपल्या दालनात बोलावणे धाडले. त्यानंतर मुख्याधिकारी खोत यांनी कक्षात प्रवेश करून सर्व अधिकार माझ्याकडे आहेत, कोणतेही काम असो माझ्या कक्षात येऊन सांगावे, निविदा प्रक्रिया राबविण्याचे अधिकार मुख्याधिकाऱ्यांकडे असतात, तुम्ही पदाधिकारी नाममात्र असतात, शासनाने सर्व अधिकार मला दिले आहेत, असे म्हणून त्यांचा अवमान केला. त्यानंतर जातिवाचक शिवीगाळ केली, असा रोजा करपत यांचा आरोप आहे.

यानंतर करपत यांनी आपल्या सहकाऱ्यांसह पोलिस ठाणे गाठले. पो.नि. किशोर मानभव यांना निवेदन देऊन खोत यांच्यावर ॲट्रॉसिटीनुसार गुन्हा नोंदवावा, अशी मागणी केली आहे. यावेळी उपनगराध्यक्ष शैलेश पटवर्धन, बालकल्याण सभापती मीना ओंडरे, बांधकाम सभापती नौरास शेख, नगरसेविका ज्योती सडमेक, सुरेखा गोडसेलवार, विलास सिडाम, विलास गलबाले, प्रशांत गोडसेलवार, महेश बाकेवार, नरेश गर्गम, राकेश सडमेक, माजी उपसरपंच कार्तिक तोगम, प्रकाश दुर्गे उपस्थित होते.

मुख्याधिकारी नॉट रिचेबल

दरम्यान, मुख्याधिकारी दिनकर खोत या घटनेनंतर नॉट रिचेबल आहेत. त्यांना वारंवार संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही. गुरुवारी ते कार्यालयातही आले नव्हते. त्यामुळे खोत गेले कोठे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

नगराध्यक्षांनी तक्रार अर्ज दिला आहे. त्या अर्जाच्या अनुषंगाने चौकशी सुरू आहे. योग्य ती कारवाई करण्यात येईल.

- किशोर मानभव, पोलिस निरीक्षक, अहेरी पोलिस ठाणे

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीGadchiroliगडचिरोली