नक्षल्यांकडून पुन्हा मिक्सर मशीनची जाळपोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2019 11:14 PM2019-05-20T23:14:55+5:302019-05-20T23:15:17+5:30

तालुक्यातील कर्रेम-बिडरी रस्त्याच्या कामावर असलेल्या काँक्रीट मिक्सर मशीनला नक्षलवाद्यांनी आग लावल्याची घटना रविवारी रात्री घडली.

Again mixer machine fireworks | नक्षल्यांकडून पुन्हा मिक्सर मशीनची जाळपोळ

नक्षल्यांकडून पुन्हा मिक्सर मशीनची जाळपोळ

Next
ठळक मुद्देअनेक कामे बंद : एटापल्ली तालुक्यातील घटना

लोकमत न्यूज नेटवर्क
एटापल्ली : तालुक्यातील कर्रेम-बिडरी रस्त्याच्या कामावर असलेल्या काँक्रीट मिक्सर मशीनला नक्षलवाद्यांनी आग लावल्याची घटना रविवारी रात्री घडली.
एटापल्ली तालुका मुख्यालयापासून १५ किमी अंतरावर कर्रेम-बिडरी दरम्यानच्या रस्त्याचे काम सुरू आहे. सदर काम जिल्हा परिषदेच्या ३०-५४ च्या निधीतून केले जात आहे. रस्त्यांवर लावलेली वाहने जाळली जात असल्याने कंत्राटदारांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक कंत्राटदारांनी काम बंद ठेवले आहे. तर काही कंत्राटदारांनी यापुढे दुर्गम भागात काम न करण्याचा निर्णय घेतला आहे. बांधकामाच्या ठिकाणी पोलिसांनी संरक्षण द्यावे, अशी मागणी कंत्राटदारांकडून केली जात आहे.

Web Title: Again mixer machine fireworks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.