शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
2
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
3
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
4
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
5
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
6
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
7
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
8
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
9
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
10
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
11
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
12
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
13
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
14
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
15
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
16
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
17
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
18
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
19
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
20
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल

९० वर्षे उलटूनही जिल्हा मार्गाची दुरूस्ती रखडली

By admin | Updated: December 8, 2015 01:53 IST

भारताला स्वातंत्र्य मिळून ६८ वर्षे पूर्ण झाली आहेत. स्वातंत्र्यपूर्वीपासून अस्तित्वात असलेल्या छत्तीसगड सीमेवरील धानोरा-

अल्लाउद्दीन लालानी ल्ल धानोराभारताला स्वातंत्र्य मिळून ६८ वर्षे पूर्ण झाली आहेत. स्वातंत्र्यपूर्वीपासून अस्तित्वात असलेल्या छत्तीसगड सीमेवरील धानोरा-चव्हेला-मुंगनेर-पेंढरी या मार्गाच्या निर्मितीसाठी कोट्यवधी रूपये खर्च करण्यात आले. मात्र नक्षल दहशतीमुळे तब्बल ९० वर्षे उलटूनही या मार्गाचे खडीकरण व डांबरीकरणाचे काम तसेच या मार्गावरील मोठया पुलाचेही काम रखडले आहे. सदर मार्गाचा प्रश्न निकाली काढण्यासाठी राज्य शासनाने आजवर कोणतेही ठोस पावले उचलली नाही. परिणामी या भागातील नागरिकांची पायपीट कायम आहे.धानोरा-चव्हेला-मुंगनेर-पेंढरी या जिल्हा मार्गाच्या देखभाल व दुरूस्तीची जबाबदारी जिल्हा परिषदेच्या धानोरा बांधकाम उपविभागाकडे आहे तर या मार्गावरील पूल निर्मिती व दुरूस्तीच्या कामाची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे. या मार्गावर पुलाचे बांधकाम करण्यात आले. मात्र निधी अभावी मागील तीन वर्षांत या मार्गाचे खडीकरण व डांबरीकरणाचे काम झाले नाही. या मार्गावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे निर्माण झाले आहेत. परिणामी गेल्या पाच वर्षांपासून या मार्गावरील महामंडळाची बससेवा बंद आहे. दुचाकी वाहने चालविणेही कठीण आहे. दोन बांधकाम विभागाच्या वादात या मार्गाच्या दुरूस्तीचे काम रखडले आहे. या मार्गावरील बोदीन ते चिमरीकलपर्यंतचा चार किमीचा रस्ता पूर्णत: मुरूमाचा आहे. या रस्त्यावर पावसाळ्यात मोठमोठे खड्डे निर्माण होतात. धानोरा-चव्हेला-पेंढरी मार्गावरील पेकीनमुडझा पयडी गावानजीक बांधलेला रपटा पावसाळ्यात वाहून गेला आहे. या मार्गावर पेंढरी परिसरातील ५० ते ६० खेडेगाव असून या परिसरातील आदिवासी नागरिकांना विविध कामांसाठी पेंढरी-कारवाफा-चातगाव मार्गे धानोरा तालुका मुख्यालयी ये-जा करावे लागते. या मार्गाने ७० किमीचा प्रवास करावा लागतो. त्यामुळे नागरिकांचा बराच वेळ व पैशाचा अपव्येय होतो. सदर समस्या लक्षात घेऊन मुंगनेर-बोदीन परिसरातील नागरिकांनी सन १९९९ मध्ये श्रमदान करून या रस्त्याची दुरूस्ती केली होती. त्यानंतर निधीअभावी या रस्त्याची पक्की दुरूस्ती एकदाही करण्यात आली नाही. शासनाच्या नकाशावर १९२४ पासून हा मार्ग अस्तित्वात आहे. मात्र गेल्या ९० वर्षांपासून या मार्गाच्या दुरवस्थेचा वनवास कायम आहे.लोकप्रतिनिधींचे आश्वासन फोलच४आजवर अनेक सत्ताधारी पुढाऱ्यांनी तसेच मंत्र्यांनी धानोरा-चव्हेला-मुंगनेर-पेंढरी या मार्गाची कायमस्वरूपी दुरूस्ती करून रहदारीसाठी सदर मार्ग तयार करण्याचे आश्वासन दिले. चव्हेलानजीक पूल निर्मितीसाठी २० लाख रूपयांची गरज असताना केवळ १० लाख रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला. यात वॉल उभारून बांधकाम करण्यात आले.