शहरं
Join us  
Trending Stories
1
पवार वि. पवार वादाला मतदार कंटाळला; बारामतीत टक्का घसरला
2
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
3
‘सेक्स स्कँडल’च्या २५,००० पेन ड्राइव्हचे पोलिसांनीच वाटप केले; कुमारस्वामी यांचा आरोप, मोदीही प्रथमच बोलले
4
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
5
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ
6
मतदानाच्या दिवशी बारामतीत नात्यांचा ट्विस्ट, सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या आईची भेट; तर अजित पवार म्हणाले... मेरी माँ मेरे साथ है!
7
‘मुस्लीम आरक्षण’ नवा मुद्दा; प्रचारात होतोय वारंवार उल्लेख, मोदींच्या जाळ्यात विरोधक अडकले
8
१० लाख इनाम असलेल्या बासित दारसह ४ अतिरेकी चकमकीत ठार
9
४ जून ‘इंडिया आघाडी’ची एक्स्पायरी डेट : पंतप्रधान मोदी 
10
घराण्याचा वारसा जिंकणार की नव्या चेहऱ्याला कौल मिळणार? विखे-लंके लढत : महसूलमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
11
‘बंगाली प्राइड’वर अन् विकास-अराजकतेमध्ये संघर्ष; दक्षिण बंगालच्या जागांवर तृणमूलची मदार
12
डाॅक्टरांच्या मनाईनंतरही धोनी खेळतोय आयपीएल; याच्या मांसपेशी फाटल्या
13
दिल्लीच्या प्ले ऑफच्या आशा कायम; राजस्थानचा २० धावांनी पराभव; संजू सॅमसनची अपयशी झुंज
14
बीअर शॉपीच्या परवान्यासाठी लाच; उत्पादन शुल्क अधीक्षकासह तीन अधिकारी जाळ्यात
15
‘मॅट’ने केले राज्य सरकारचे पोस्टमार्टेम; वैद्यकीय शिक्षण संचालकांची नियुक्ती तत्काळ संपुष्टात आणण्याचे आदेश; नवीन संचालक नेमा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

कोरोनाचे रुग्ण वाढताच प्रशासकीय यंत्रणा अलर्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2020 5:00 AM

गडचिरोली जिल्ह्यात शनिवारपर्यंत कोरोनाचा एकही रुग्ण पॉझिटीव्ह नव्हता. दरम्यान संचारबंदीच्या नियमात शिथीलता केल्याने रेड झोन असलेल्या मुंबई, पुणे, नागपूर येथून अनेक प्रवाशी अहेरी उपविभागासह गडचिरोली जिल्ह्यात परतले. येथूनच गडचिरोली जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाला. ग्रीन झोन असलेला गडचिरोली जिल्हा आॅरेंज झोनमध्ये आल्यावर प्रशासकीय यंत्रणा अलर्ट झाली आहे.

ठळक मुद्देप्रवाशांची कसून चौकशी : भामरागड व ताडगावात उभारले चेकपोस्ट, वाहनांची तपासणी

लोकमत न्यूज नेटवर्कभामरागड : कोरोनाबाबत ग्रीन झोनमध्ये असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत कोरोनाचा शिरकाव झाला. तब्बल आठ रुग्ण पॉझिटीव्ह आढळून आल्याने भामरागड तालुक्याची पोलीस व प्रशासकीय यंत्रणा अलर्ट झाली आहे. बुधवारी भामरागड व ताडगाव येथे नाकाबंदी चेकपोस्ट उभारण्यात आले असून ये-जा करणारे वाहन व नागरिकांची कसून चौकशी केली जात आहे.गडचिरोली जिल्ह्यात शनिवारपर्यंत कोरोनाचा एकही रुग्ण पॉझिटीव्ह नव्हता. दरम्यान संचारबंदीच्या नियमात शिथीलता केल्याने रेड झोन असलेल्या मुंबई, पुणे, नागपूर येथून अनेक प्रवाशी अहेरी उपविभागासह गडचिरोली जिल्ह्यात परतले. येथूनच गडचिरोली जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाला. ग्रीन झोन असलेला गडचिरोली जिल्हा ऑरेंज झोनमध्ये आल्यावर प्रशासकीय यंत्रणा अलर्ट झाली आहे. भामरागड तालुका प्रशासनाच्या वतीने संचारबंदीच्या नियमाचे काटेकोर पालन होण्यासाठी खबरदारी घेतली जात आहे.विशेष म्हणजे भामरागड येथील व्यापाऱ्यांनी गर्दी टाळण्यासाठी बुधवारी बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. दिवसभर बाजारपेठ बंदच होती. असे असताना सुद्धा आलापल्ली-भामरागड या मुख्य मार्गावरून नागरिकांचे आवागमन कमी झाले नाही. त्यामुळे तहसीलदार सत्यनारायण सिलमवार यांनी सदर मार्गावरून बाहेरून येणाऱ्या नागरिकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी ताडगाव व भामरागड येथे चेकपोस्ट उभारले. या चेकपोस्टवर महसूल, वन, आरोग्य व नगर पंचायतीचे कर्मचारी कर्तव्य बजावत आहेत. या चेकपोस्टवर दररोज सात कर्मचारी तैनात असतात.जिल्हा व राज्याबाहेरून भामरागडात प्रवेश करणाऱ्याची माहिती तत्काळ तहसील कार्यालयातील नियंत्रण कक्षाला कळविली जात आहे. भामरागड तालुक्यात कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी तहसीलदार सिलमवार हे परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या