कोरोनाचे रुग्ण वाढताच प्रशासकीय यंत्रणा अलर्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2020 05:00 AM2020-05-22T05:00:00+5:302020-05-22T05:00:56+5:30

गडचिरोली जिल्ह्यात शनिवारपर्यंत कोरोनाचा एकही रुग्ण पॉझिटीव्ह नव्हता. दरम्यान संचारबंदीच्या नियमात शिथीलता केल्याने रेड झोन असलेल्या मुंबई, पुणे, नागपूर येथून अनेक प्रवाशी अहेरी उपविभागासह गडचिरोली जिल्ह्यात परतले. येथूनच गडचिरोली जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाला. ग्रीन झोन असलेला गडचिरोली जिल्हा आॅरेंज झोनमध्ये आल्यावर प्रशासकीय यंत्रणा अलर्ट झाली आहे.

Administrative system alerts as Corona's patient grows | कोरोनाचे रुग्ण वाढताच प्रशासकीय यंत्रणा अलर्ट

कोरोनाचे रुग्ण वाढताच प्रशासकीय यंत्रणा अलर्ट

Next
ठळक मुद्देप्रवाशांची कसून चौकशी : भामरागड व ताडगावात उभारले चेकपोस्ट, वाहनांची तपासणी

लोकमत न्यूज नेटवर्क
भामरागड : कोरोनाबाबत ग्रीन झोनमध्ये असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत कोरोनाचा शिरकाव झाला. तब्बल आठ रुग्ण पॉझिटीव्ह आढळून आल्याने भामरागड तालुक्याची पोलीस व प्रशासकीय यंत्रणा अलर्ट झाली आहे. बुधवारी भामरागड व ताडगाव येथे नाकाबंदी चेकपोस्ट उभारण्यात आले असून ये-जा करणारे वाहन व नागरिकांची कसून चौकशी केली जात आहे.
गडचिरोली जिल्ह्यात शनिवारपर्यंत कोरोनाचा एकही रुग्ण पॉझिटीव्ह नव्हता. दरम्यान संचारबंदीच्या नियमात शिथीलता केल्याने रेड झोन असलेल्या मुंबई, पुणे, नागपूर येथून अनेक प्रवाशी अहेरी उपविभागासह गडचिरोली जिल्ह्यात परतले. येथूनच गडचिरोली जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाला. ग्रीन झोन असलेला गडचिरोली जिल्हा ऑरेंज झोनमध्ये आल्यावर प्रशासकीय यंत्रणा अलर्ट झाली आहे. भामरागड तालुका प्रशासनाच्या वतीने संचारबंदीच्या नियमाचे काटेकोर पालन होण्यासाठी खबरदारी घेतली जात आहे.
विशेष म्हणजे भामरागड येथील व्यापाऱ्यांनी गर्दी टाळण्यासाठी बुधवारी बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. दिवसभर बाजारपेठ बंदच होती. असे असताना सुद्धा आलापल्ली-भामरागड या मुख्य मार्गावरून नागरिकांचे आवागमन कमी झाले नाही. त्यामुळे तहसीलदार सत्यनारायण सिलमवार यांनी सदर मार्गावरून बाहेरून येणाऱ्या नागरिकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी ताडगाव व भामरागड येथे चेकपोस्ट उभारले. या चेकपोस्टवर महसूल, वन, आरोग्य व नगर पंचायतीचे कर्मचारी कर्तव्य बजावत आहेत. या चेकपोस्टवर दररोज सात कर्मचारी तैनात असतात.
जिल्हा व राज्याबाहेरून भामरागडात प्रवेश करणाऱ्याची माहिती तत्काळ तहसील कार्यालयातील नियंत्रण कक्षाला कळविली जात आहे. भामरागड तालुक्यात कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी तहसीलदार सिलमवार हे परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहेत.

Web Title: Administrative system alerts as Corona's patient grows

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.