प्राप्त माहितीनुसार, चामोर्शी ते आष्टी मुख्य मार्गावर ग्रामीण रुग्णालयाजवळ रोशन पाटेवार (१९) आणि संजय जगन्नाथ (२७) रा.लालडोंगरी हे हातभट्टीची ४५ लिटर दारू दुचाकी वाहनावरून घेऊन जात होते. त्यांच्यावर दारूबंदी कायद्यानुसार कारवाई करण्यात आली. तपास पोलीस हवालदार राजेश गणवीर करीत आहेत.
दुसऱ्या घटनेत पोलीस नाईक सुमित गायकवाड, शिपाई विजय केंद्रे यांना मौजा सोनापूर गावाजवळ आष्टी मार्गाने रेतीची वाहतूक करताना दोन ट्रॅक्टर दिसून आले. ट्रॅक्टरचालक डंबाजी रायसिडाम व दीपक नागापुरे यांच्याकडे गौण खनिज वाहतूक परवाना नसल्याचे आढळले. त्यामुळे दोन्ही ट्रॅक्टर पोलीस ठाण्यात आणून जमा केले. ट्रॅक्टरचालकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जप्त करण्यात आलेले ट्रॅक्टर अरुण कुनघाडकर रा.सोनापूर यांच्या मालकीचे असल्याचे समजले. सदर कारवाया उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणील गिल्डा यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक बिपिन शेवाळे यांच्या पथकातील ज्ञानेश्वर लाकडे, पोलीस शिपाई संदीप भिवनकर, सतीश जाधव यांनी केली.