शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

नियतीचा बेरंग... देवदर्शन करून परतताना दाेन जिवलग मित्र ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2023 21:48 IST

गडचिराेलीतील बेहरे पेंटरचा समावेश : अमरावती-नागपूर महामार्गावरील घटना

गडचिरोली : आयुष्यभर कुंचल्यातून रंग पेरणाऱ्या युवराज बेहरे या  हरहुन्नरी कलावंतांच्या आयुष्याचा नियतीने बेरंग केला. देवदर्शन करून परतताना दोन जीवलग मित्रांच्या आयुष्याच्या प्रवासाला पूर्णविराम लागला अन् संपूर्ण शहर शोकाकुल झाले. अमरावती-नागपूर महामार्गावरील कोंढाळीजवळ १८ जूनला पहाटे ४ वाजेच्या सुमारास ही दुर्घटना घडली. 

या अपघातात पेंटर युवराज बेहरे व त्यांचा छत्तीसगड राज्यातील राजनांदगाव येथील मित्र, असे दोघेजण ठार झाले. युवराज बेहरे यांची पत्नी विभा बेहरे व राजनांदगाव येथील मित्राची पत्नीही जखमी झाली आहे. उपचारादरम्यान रविवारी सकाळी ८:३० च्या सुमारास युवराज बेहरे यांचे निधन झाले. मृतक युवराज व्यंकटी बेहरे (वय ५०, रा. कन्नमवार वॉर्ड, गडचिरोली), गंभीर जखमी पत्नी विभा युवराज बेहरे व त्यांची मुले  चार दिवसांपूर्वी आपल्या कारने महाबळेश्वर या ठिकाणी गेले होते. साेबत मित्राचे कुटुंबीय हाेते. दाेन वाहनांनी ते गावाकडे परत येत हाेते. समाेर बेहरे यांच्या मालकीची गाडी आणि मागे भाड्याने नेलेली दुसरी गाडी हाेती. पहिल्या गाडीच्या चालकाला डुलकी लागल्याने सदर गाडी उलटली. यात बेहरे यांचा मित्र जागीच ठार झाला, तर डाेक्याला दुखापत झाल्याने बेहरे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. बेहरे यांची मुले मागच्या कारमध्ये असल्याची माहिती असून, ते सुखरूप आहेत. त्यांची पत्नी विभा या गंभीर जखमी असून नागपूर येथे उपचार सुरू आहेत. 

उत्तम कलावंताला गडचिराेलीकर मुकले 

गेल्या २० वर्षांपासून युवराज बेहरे हे पेंटर म्हणून काम करीत. सुबक रांगाेळी काढण्याची कलाही त्यांना अवगत हाेती.  विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटनांतर्फे आयोजित कार्यक्रमात त्यांनी साकारलेली रांगाेळी लक्ष वेधून घ्यायची. त्यांच्या जाण्याने गुणी कलावंताला गडचिराेलीकर मुकले. त्यांच्या पार्थिवावर साेमवारी सकाळी ८ वाजता कठाणी नदी घाटावर अंत्यसंस्कार हाेणार आहेत.

टॅग्स :AccidentअपघातGadchiroliगडचिरोली