गडचिरोली जिल्ह्यात अपघात; एक ठार दोन गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2020 10:17 AM2020-06-13T10:17:36+5:302020-06-13T10:39:11+5:30

लगाम येथे कार व ट्रकच्या धडक होऊन तीत एक ठार व दोनजण गंभीर झाल्याची घटना शनिवारी सकाळी ९ च्या सुमारास घडली.

Accident in Gadchiroli district; One killed two serious | गडचिरोली जिल्ह्यात अपघात; एक ठार दोन गंभीर

गडचिरोली जिल्ह्यात अपघात; एक ठार दोन गंभीर

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली:  मुलचेरा  तालुक्यातील लगाम चेक येथील हनुमान मंदिराजवळच्या वळणावर आज सकाळी ०८.४५  वाजताच्या सुमारास अहेरीवरून चंद्रपूरकडे भरधाव वेगाने जाणारी अर्टिगा गाडी क्रमांक एम एच 33 व्ही 0959  व विरुद्ध दिशेने मंचेरियालला जेसीबी घेऊन येणारा ट्रक क्रमांक ए पी 29  टी ए 7828 यांच्यात जोरदार टक्कर झाली.यात आर्टिगामधील अहेरी येथील श्यामराव गुंडावार वय 48 हे जागीच ठार झाले तर त्यांचा भाचा मोहनिश एग्लोपवार वय 21 व वाहन चालक सुधीर दासरवार (बन्नी) वय 19 हे दोघे गंभीर जखमी असून त्यांना अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे .सदर वाहन सचिन पडलवार यांच्या मालकीचे असून वृत्त लिहीपर्यंत घटनास्थळी पोलीस आलेले नव्हते तसेच मृतक शामराव गुंडावार हे गाडीत अडकलेले होते. सदर अपघातामुळे दोनही बाजूला वाहनाच्या रांगा लागल्या होत्या त्यामुळे एक तास वाहतूक खोळंबली होती. शामराव गुंडावार हे आपल्या भाच्याला चंद्रपूर येथे दवाखान्यात नेत होते.

Web Title: Accident in Gadchiroli district; One killed two serious

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात