लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली: आलापल्ली-सिरोंचा मार्गावर गुंडेरा व रेपणपल्ली दरम्यान एका भरधाव ट्रकने दुचाकीस्वाराला दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाला. ही घटना मंगळवारी (दि. ९) दुपारी ३ च्या सुमारास घडली. पूनम मुंडी वेमुला असे या चालकाचे नाव आहे. तो आलापल्लीकडून सिरोंचाकडे जात असताना ट्रक क्र. ए.पी ३९ यू २४८८ हा सिरोंचाकडून आलापल्लीकडे येत होता. त्याने दुचाकीला जोरदार धडक दिली. अधिक वृत्त लवकरच देत आहोत.
गडचिरोली जिल्ह्यात अपघात: एक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2019 16:07 IST