शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

लेकीच्या डोळ्यादेखत आईवर वाघाची झडप, हल्ल्यात जागीच मृत्यू; वाकडीच्या जंगलातील घटना

By संजय तिपाले | Updated: January 3, 2024 15:19 IST

नव्या वर्षातही हल्ल्यांचे सत्र सुरुच

गडचिरोली: शहरापासून सात किलोमीटरवरील वाकडी येथील जंगल क्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू झाला. ही खळबळजनक घटना ३ जानेवारी रोजी दुपारी दोन वाजता घडली. दरम्यान, लेकीच्या डोळ्यादेखत आईवर वाघाने झडप घातली. यानंतर आई जोरात किंचाळली. मात्र, वाघ तिला ठार करुनच थांबला. या हृदयद्रावक घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मंगलाबाई विठ्ठल बोळे (५५, रा. वाकडी ता.गडचिरोली) असे मयत महिलेचे नाव आहे. ती आपली कन्या शीतल तीक्षण रोहनकर व अन्य काही महिलांसोबत गावापासून अर्धा किलोमीटरवरील जंगलातील कक्ष क्र. १७१ मध्ये सरपण गोळा करण्यासाठी गेली होती. तेथे दाट झुडूपात वाघ दडून बसल्याची तिला खबर नव्हती. सरपण गोळा करण्यात माय-लेकी व्यग्र असतानाच वाघाने मंगलाबाई यांच्यावर पाठीमागून हल्ला चढविला. यानंतर त्या जोराने ओरडल्या. कन्या शीतल व इतर महिलांनी आवाजाच्या दिशेने धाव घेतली तेव्हा मंगलाबाई या वाघाशी झुंज देताना आढळल्या. मात्र, वाघाने त्यांच्या गळ्यावर पंजाने हल्ला केला. रक्तस्त्राव होऊन त्या जागीच मृत्युमुखी पडल्या. यानंतर कन्या शीतलसह इतर महिला आरडाओरड केल्याने वाघ पळून गेला. महिलांनी गावात येऊन माहिती दिल्यावर गावकऱ्यांनी धाव घेतली. गडचिरोली वनविभागाचे अधिकारी तसेच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. 

बोधलीतही केला होता हल्ला

गडचिरोली वनपरिक्षेत्रातील बोधली गावात ३० डिसेंबरला मंदाबाई कोठारे यांच्यावर वाघाने हल्ला केला होता. यावेळी इतर महिलांनी आरडाओरड केल्याने वाघ पळून गेला. त्यामुळे मंदाबाई थोडक्यात वाचल्या होत्या. याच जंगल परिक्षेत्रातील वाकडी येथे ३ जानेवारीला वाघाने मंगलाबाई बोळे यांचा वाघाने बळी घेतला. त्यामुळे या भागात मोठी दहशत पसरली आहे.गतवर्षी वाघाने घेतले सहा बळी

मावळत्या वर्षात वाघाने जिल्हाभरात सहा जणांचा बळी घेेतला होता. देसाईगंज तालुक्यातील फरी, आरमोरी तालुक्यातील रामाळा, कुरखेडा तालुक्यातील ढुसी, गडचिरोली तालुक्यातील हिरापूर, भगवानपूर, गोविंदपूर येथे प्रत्येकी एकाचा वाघाच्या हल्ल्यात बळी गेला. नव्या वर्षातही हल्ल्याचे सत्र सुरुच असल्याने मानव व वन्यजीव संघर्ष तीव्रच असल्याचे चित्र आहे.