शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
2
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
3
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
4
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
5
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
6
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
7
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
8
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
9
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
10
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
11
शतांक विपरीत राजयोग: ९ राशींना वक्री शनिचे वरदान, सुबत्ता भरभराट; भरघोस लाभ, शुभ कल्याण होईल!
12
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
13
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
14
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
15
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
16
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
17
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
18
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
19
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
20
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती

मुडझाच्या झुडपी जंगलात बिबट्या मृतावस्थेत आढळला, मृत्यूचे कारण गुलदस्त्यात

By दिलीप दहेलकर | Updated: October 30, 2022 18:10 IST

गडचिराेली वनपरिक्षेत्रातील कक्ष क्रमांक १६८ मध्ये बिबट्या मृत अवस्थेत आढळला. 

गडचिरोली : गडचिराेली वनपरिक्षेत्रातील कक्ष क्रमांक १६८ मधील मुडझा गावालगतच्या झुडपी जंगलात बिबट मृतावस्थेत आढळून आल्याची घटना ३० ऑक्टोबर रोजी रविवारला सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास उघडकीस आली. मुडझा गावालगतच्या कक्ष क्रमांक १६८ मधील झुडपी जंगलात वनकर्मचारी गस्त करीत असतांना बिबट हा मृतावस्थेत आढळून आला. 

घटनेची माहिती मिळताच गडचिरोलीचे उपवनसंरक्षक मिलिश दत्त शर्मा यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक वनसंरक्षक सोनल भडके, वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रादेशिक) अरविंद पेंदाम, क्षेत्रसहाय्यक श्रीकांत नवघरे, बोदलीचे वनरक्षक भसारकर, चांदाळाचे वनरक्षक गौरव हेमके व वाघ संनियंत्रक पथक, गडचिरोली व अधिनस्त संपुर्ण वनाधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटना स्थळावर पाहणी केली असता, मृत बिबट हा अंदाजे दिड ते दोन वर्ष वयाचा असून त्याच्या शरीरावर कुठल्याही जखमा आढळून आल्या नाही. सदर मृत बिबटयाचे शवविच्छेदन पाेटेगावचे पशुधन विकास अधिकारी डॉ. बि.ए. रामटेके यांनी केले. प्राथमिक स्वरुपात मृत्यूचे कारण अजूनही कळले नसले तरी गोळा केलेल्या नमुन्याचा परिक्षण अहवाल प्राप्त झाल्यानंतर मृत्यूचे खरे कारण कळणार आहे.

सहाय्यक वनसंरक्षक एस. बी. भडके व वनपरिक्षेत्र अधिकारी अ.नि. पेंदाम यांनी प्राथमिक चौकशी केली असता, शरीराचे सर्व अवयव सुरक्षित असल्याचे दिसून आले. नख, मिशा, पंजे आदी व्यवस्थित आहेत. आजुबाजुला शिकारी बाबतचे कुठलेही ठोस पुरावे आढळले नाही. सदर संपूर्ण कार्यवाहीत वन्यजीव मानद रक्षक मिलींद उमरे व वन्यजीव प्रेमी अजय कुकडकर तसेच मुडझा येथील पोलीस पाटील लाेचन महेंद्र मेश्राम, तुलाराम राऊत, गा. पं. सदस्य सुरेखा सुरपाम आदी  उपस्थित होते. मृत बिबटयाचे शवविच्छेदन करून मृत शरीरास अग्नी देऊन सर्वांसमक्ष नष्ट करण्यात आले.

वनविभाकडून सावधानतेचा इशारा सदर प्रकरणावरुन आजुबाजुच्या परिसरात बिबट व त्यांचे बछडे असल्याचा संशय व्यक्त केल्या जात आहे. घटना स्थळाच्या आजुबाजुच्या जंगल परिसरात गावकऱ्यांनी जाऊ नये व आपले पाळीव प्राणी सुध्दा या भागातील जंगलात नेऊ नये असे आवाहन सहाय्यक वनसंरक्षक सोनल भडके व वनपरिक्षेत्र अधिकारी अरविंद पेंदाम यांनी केले आहे. सदर घटनेची चौकशी उपवनसंरक्षक मिलिश दत्त शर्मा यांच्या मार्गदर्शनात सहायक वनसंरक्षक सोनल भडके व वनपरिक्षेत्र अधिकारी अरविंद पेंदाम करीत आहेत.

  

टॅग्स :Gadchiroliगडचिरोलीleopardबिबट्याDeathमृत्यू