शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

रानटी हत्तींचा कळप आला, १४ घरे पाडून गेला; भीतीपोटी मुलाबाळांसह नागरिकांची धावाधाव

By संजय तिपाले | Updated: August 2, 2023 17:07 IST

आंबेझरी गावात धुडगूस

गडचिरोली : गोंदिया जिल्ह्यात सीमावर्ती भागात धुडगूस घालणाऱ्या रानटी हत्तींच्या कळपाने २ ऑगस्ट रोजी पहाटे आंबेझरी (ता.कुरखेडा) येथे १४ घरे जमीनदोस्त केली. १८ ते २० हत्तींच्या कळपाने धुमाकूळ घातल्याने नागरिकांना मुलाबाळांसह जीवाच्या भीतीने घरे सोडून धावाधाव करावी लागली. या घटनेने अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत.         आंधळी(सोनपूर) गट ग्रामपंचायत अंतर्गत फक्त ३६ कुटुंब असलेला आंबेझरी हे गाव  डोगंर व घनदाट जंगलाने वेढलेले आहे. आदिवासींच्या या गावात २ ऑगस्ट रोजी पहाटे १८ ते २० चा संख्येत असलेल्या रानटी हत्तीचा कळपाने  हल्ला चढवला.घरांची नासधूस करण्यास सूरुवात केली. अचानक झालेल्या या हल्ल्याने  घाबरलेल्या नागरिकांनी मुलाबाळांसह घरातून बाहेर पळ काढला. काही वेळानंतर स्वत:ला सावरत गावकऱ्यांनी टेंभे पेटवत हत्तीच्या कळपाला पिटाळून लावण्याचा प्रयत्न  केला.मात्र, हत्तींनी गावकऱ्यांना दाद न देता धुडगूस सुरुच ठेवला. माहिती मिळताच   पुराडा वनपरिक्षेत्र अधिकारी बालाजी दिघोडे यांनी गावात भेट दिली व पंचनामा केला.

डोक्यावरचे छत गेले, धान्याचीही नासाडी

या हल्ल्यात अनेक घरांची पडझड झाली. संसारोपयोगी साहित्यासह धान्याचे नुकसान झाले.  त्यामुळे येथील गरीब कुटुंबांना बेघर होण्याची वेळ ओढावली. अतिदुर्गम गाव असल्याने येथे चार ते सहा महिन्यांचे धान्य साठा करुन ठेवतात. मात्र, डोक्यावरचे छत तर गेलेच, पण धान्याचीही नासाडी झाल्याने गावकरी हैराण झाले आहेत.  

यांचे झाले नुकसान

आंबेझरी येथील आनंदराव हलामी, बारीकराव मडावी, आसाराम मडावी, भाऊदास मडावी, तुकाराम मडावी, सखाराम मडावी, चून्नीलाल बूद्धे, दिलीप मडावी, लालाजी मडावी, धर्मराव हलामी, शामराव काटेंगे, यशवंत हलामी, रैसू हलामी, मंगरू हलामी यांचा घराची नासधूस झाली आहे. शासनाने अन्नधान्याची सोय करुन भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :wildlifeवन्यजीवGadchiroliगडचिरोली