शहरं
Join us  
Trending Stories
1
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
2
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
3
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
4
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
5
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
6
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
7
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
8
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
9
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
10
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
11
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
12
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
13
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
14
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
15
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
16
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
17
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
18
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
19
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
20
इंडिया आघाडीला मोठा धक्का, बड्या पक्षाने सोडली साथ, विरोधी पक्षांचं ऐक्य कमकुवत होणार?  

९ लाखांची अतिरिक्त मजुरी प्रलंबित

By admin | Updated: July 13, 2016 02:08 IST

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत जिल्हा परिषदेने सन २०१६-१७ या आर्थिक वर्षात

रोजगार हमी योजना : विलंब झाल्यास व्याजासह मिळते मजुरी गडचिरोली : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत जिल्हा परिषदेने सन २०१६-१७ या आर्थिक वर्षात आतापर्यंत ७ लाख ७८ हजार ५३५ रूपये अतिरिक्त व्याजासह मजुरी म्हणून मजुरांना अदा केले आहेत. अद्यापही प्रशासनाकडे ९ लाख १८ हजार ७०० रूपयांची व्याजासह अतिरिक्त मजुरी प्रलंबित आहे. त्यामुळे रोहयो मजूर ऐन खरीप हंगामात अडचणीत सापडले आहेत. प्रशासनाने तत्काळ प्रलंबित मजुरी अदा करावी, अशी मागणी आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्हा परिषदेसह विविध यंत्रणांच्या वतीने अनेक कामे केली जातात. ग्रामपंचायतस्तरावर रोहयोच्या माध्यमातून ५० टक्के कामे केली जातात. नोंदणीकृत प्रत्येक मजुराला १०० दिवसांचा रोजगार देण्याची हमी राज्य शासनाने रोहयोच्या कायद्यान्वये दिली आहे. त्यादृष्टीने प्रशासनाकडून रोजगार देण्यासाठी प्रयत्नही केले जातात. मात्र मजुरी थकीत असण्याचे प्रमाण अधिक आहे. थकीत मजुरीमुळे मजूर अडचणीत येऊ नये तसेच अशा मजुरांना दिलासा मिळावा, यासाठी राज्य सरकारने दोन वर्षांपूर्वी नवा शासन निर्णय काढून थकीत मजुरीवर व्याज लावून अतिरिक्त मजुरी अदा करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. या निर्णयाची अंमलबजावणी गडचिरोली जिल्ह्यात सुरू आहे. प्रशासनाच्या वतीने जिल्ह्यात दरवर्षी रोहयो कामाची मजुरी देण्यास विलंब झालेल्या मजुरांना व्याजासह अतिरिक्त मजुरी दिली जात आहे. (स्थानिक प्रतिनिधी) ही आहेत मजुरी विलंबाची कारणे रोजगार हमी योजनेच्या कामावरील नोंदणीकृत मजुरांना आपला आधारकार्ड क्रमांक बँक खात्याशी लिंकिंग करणे अत्यावश्यक आहे. तसेच संबंधित मजुरांनी नरेगा प्रशासनाकडे आपला अचूक बँक खाते क्रमांक देणे गरजेचे आहे. मात्र गडचिरोली जिल्ह्याच्या दुर्गम व ग्रामीण भागातील अनेक मजूर अद्यापही अशिक्षित आहेत. अनेक मजुरांनी आपल्या बँक खात्याशी आधारकार्ड लिंकिंग केलेले नाही. शिवाय अनेक मजुरांनी चुकीचे बँक खाते क्रमांक नरेगाच्या प्रशासकीय अधिकाऱ्याकडे दिले आहेत. यासह विविध तांत्रिक कारणामुळे रोजगार हमी योजनेच्या कामावरील मजुरांची मजुरीची रक्कम अनेक महिने थकीत असते. मजुरांच्या बँक खाते क्रमांकात अनेक त्रूट्या असल्याची माहिती नरेगा विभागाच्या सूत्रांकडून मिळाली आहे. रोजगार सेवकाकडून हजेरी पत्रक उशिरा भरल्या जात असल्याने मजुरांची मजुरी प्रलंबित राहते.