शहरं
Join us  
Trending Stories
1
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
2
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
3
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
4
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
5
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
6
'काँग्रेसचा अजेंडा; पण तुम्ही ना कलम 370, ना CAA...', पीएम मोदींचे काँग्रेसला ओपन चॅलेंज
7
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
8
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
9
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
10
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
11
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
12
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
13
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
14
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
15
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
16
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
17
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
18
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
19
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
20
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास

८१ गावे विजेने प्रकाशली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2017 12:46 AM

गडचिरोली जिल्ह्यातील १ हजार ६०० गावांपैकी २६७ गावांपर्यंत वीज पोहोचली नव्हती. महावितरणने यापैैकी ८१ गावांपर्यंत वीज पोहोविली असून उर्वरित १४१ गावांमध्ये ३१ मार्च २०१८ पर्यंत वीज पोहोचविण्याचे उद्दिष्ट दिले आहे.

ठळक मुद्देवीज विभागाचे कार्य : दुर्गम भागातील गावांमध्ये आनंदोत्सव

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील १ हजार ६०० गावांपैकी २६७ गावांपर्यंत वीज पोहोचली नव्हती. महावितरणने यापैैकी ८१ गावांपर्यंत वीज पोहोविली असून उर्वरित १४१ गावांमध्ये ३१ मार्च २०१८ पर्यंत वीज पोहोचविण्याचे उद्दिष्ट दिले आहे.गडचिरोली जिल्ह्याचा ८० टक्के भाग जंगलाने व्यापला आहे. यातील बहुतांश गावे घनदाट जंगलाने व्यापली आहेत. काही गावे डोंगरदºयांमध्ये वसली आहेत. या गावांची लोकसंख्या अत्यंत कमी आहे. काही गावांमध्ये १० ते १५ घरे आहेत. यासर्व अडचणी असल्यामुळे महावितरणने आजपर्यंत २६७ गावांमध्ये वीज पोहोचविली नव्हती. त्यामुळे या गावांमधील नागरिक अंधारातच आपले जीवन कंठत होते. शहर व ग्रामीण भागात विजेच्या दिव्यांचा झगमगाट होत असताना दुर्गम भागातील नागरिक मात्र अंधारात चाचपडत राहत होते.वीज उपलब्ध होणे हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे. त्यामुळे सर्व गावांना कोणत्याही परिस्थिती वीज उपलब्ध करून देण्याचे निर्देश राज्य शासनाने दिले होते. सुरुवातीच्या कालावधीत ज्या गावांजवळपास वीज पोहोचली आहे, तेथून वीज नसलेल्या गावांना वीज पुरवठा करण्यात आला. पहिल्या टप्प्यात ८१ गावे प्रकाशमान झाली आहेत.महावितरण नागपूर विभागाचे प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत यांच्या मार्गदर्शनात चंद्रपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता दिलीप घुगल, गडचिरोली मंडळाचे अधीक्षक अभियंता अशोक मस्के यांनी योग्य नियोजन करून आपली यंत्रणा कामाला लावली. वीज विभागाच्या कर्मचाºयांनीही सामाजिक दायित्वाची जाणीव ठेवत ग्रामीण व दुर्गम भागात विजेची रोहित्र व तत्सम सामुग्री पोहोचविली. दुर्गम भागातील बहुतांश नागरिक बीपीएलधारक असल्याने या नागरिकांना दीनदयाल उपाध्याय ग्रामज्योती योजनेअंतर्गत दारिद्र्यरेषेखालील सर्व ग्राहकांना विनामूल्या वीज जोडणी उपलब्ध करून दिली जाणार आहे.३१ मार्चपर्यंत उर्वरित गावांना वीज पुरवठा२६७ गावांपैकी ८१ गावांमध्ये वीज पुरवठा झाला आहे. उर्वरित १४१ गावांना ३१ मार्च २०१८ पर्यंत वीज पुरवठा करण्याचे नियोजन वीज विभागाने केले आहे. जिल्हा नियोजन समितीने १२ कोटी ६८ लाख रूपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे.विद्युतीकरण करण्यात आलेली गावेमारकेगाव, पुट्टारगोंडी, मागदंडटोला, यजूटोला, किसनेली, मोथाझेलीया, लहानवडगाव, सलाईटोला, मारगिनटोला, हुराटोला, केहकावाही, धुरमुडाटोला, येरांडीटोला, भुसुमकुडो, दाब्बा, रानवाही, शिवगटा , एकराखटोला, कुद्री, कामके, रोपी, झुपी, पेनगंडा, घाटपाडी, कुचेर, वडसाकाल, सिडामटोला, जांभूळगटटा, तारामटोला, कनोली, कानाकोंडा(बु), कोनाकोडां(ख्ुा), कोंडाटोला, येकाबंडाटोला, चारवाही, बंधूर, कहकावाही एस, गडाडपल्ली टोला, कुंडूमटोला, विकासपल्ली, कुसुमपल्ली, भिमनखोजी, दुसागुडा, मालनगट्टा, हजबोडी, रेखामेटा, मर्दकुही, पाउरवेल, तिरणपार, हुरयालदंड, रमेषगुडम, कोलाटोला, वडगाव मोटाटोला, इटामरका, करमे कसनसुर, जवेली, झुरी, केसनिर, जूही टोला, हंटाजूर रिट, येनगाव, हलकनार, मोरचूल, नारकसा, टेकामेटा, मोहूर्ली, कोहका, बैलमागड, पिपली , बुर्गा, हेटलकसा, धोडेपलली, बोटलाचेरू टोला, कर्मे टोला, मेडपल्ली, नवेगाव टोला, रायपूर टोला, इरपनपल्ली, कुरूमवाडा या गावात प्रकाष पोहोचला असून आदिवासी बांधवाप्रति महावितरणचे एक दायित्व पार पडले आहे.