शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

लोकअदालतीत तब्बल सात हजार प्रकरणांची सुनावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2021 05:00 IST

प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधिसेवा प्राधिकरणचे अध्यक्ष यु. बी. शुक्ल यांनी लोकअदालतीमुळे सर्वसामान्य नागरिकांचा वेळ वाचतो, त्यांचे पैसे वाचतात, तसेच न्यायालयाचाही कामाचा ताण कमी होत असल्याचे मत व्यक्त केले. नागरिकांनी मोठ्या प्रमाणात अशा लोकन्यायालयात सहभाग नोंदवून आपसी तडजोड करण्यास उपस्थित राहावे, असे आवाहन यावेळी न्या. शुक्ल यांनी केले. यावेळी विधिसेवा प्राधिकरणचे सचिव डी. डी. फुलझेले यांनी समझोता केलेल्या पक्षकारांचे आभार मानून त्यांचे अभिनंदनही केले.

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : महाराष्ट्र राज्य विधिसेवा प्राधिकरण आणि गडचिरोली जिल्हा विधिसेवा प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन केले होते. यात न्यायालयात दाखल असलेल्या ७५० प्रलंबित प्रकरणांसह जवळपास ६,५०० दाखलपूर्व प्रकरणांवर सुनावणी करण्यात आली. त्यात ८९ प्रलंबित तर ४१४ दाखलपूर्व प्रकरणे आपसी तडजोडीने निकाली काढण्यात आली.प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधिसेवा प्राधिकरणचे अध्यक्ष यु. बी. शुक्ल यांनी लोकअदालतीमुळे सर्वसामान्य नागरिकांचा वेळ वाचतो, त्यांचे पैसे वाचतात, तसेच न्यायालयाचाही कामाचा ताण कमी होत असल्याचे मत व्यक्त केले. नागरिकांनी मोठ्या प्रमाणात अशा लोकन्यायालयात सहभाग नोंदवून आपसी तडजोड करण्यास उपस्थित राहावे, असे आवाहन यावेळी न्या. शुक्ल यांनी केले. यावेळी विधिसेवा प्राधिकरणचे सचिव डी. डी. फुलझेले यांनी समझोता केलेल्या पक्षकारांचे आभार मानून त्यांचे अभिनंदनही केले. न्यायालयात दाखल प्रलंबित प्रकरणांमध्ये प्रामुख्याने कौटुंबिक, आर्थिक वाद तसेच ज्यावर आपसी तडजोड होऊ शकते अशा फौजदारी तक्रारी ठेवण्यात आल्या होत्या. सर्वसामान्य लोकांना अचानक वादविवाद, तक्रारीमुळे अनेकदा न्यायालयाची पायरी चढावी लागते. अशावेळी गोरगरीब, गरजू लोकांना याचा सर्वाधिक फायदा होतो. यामध्ये विविध बँकांमधील, वीज वितरण कार्यालयातील प्रलंबित प्रकरणे, वाहतूक विभागाच्या दंडात्मक कारवाईची प्रकरणे अशा लोकअदालतीमध्ये सोडविण्यात आली.

आपसी समझोता झालेल्या कुटुंबांचा सन्मान-  कौटुंबिक वादविवादामध्ये आपसी समझोता झाल्यानंतर जिल्हा विधिसेवा प्राधिकरणचे अध्यक्ष तसेच सचिव यांनी काही कुटुंबीयांचा साडी व पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला. तसेच पुढील सुखी जीवनासाठी शुभेच्छा दिल्या. प्रकरण तडजोडीतून मिटल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर झळकत होता. 

२ कोटी १२ लाखांच्या थकबाकीची वसुलीया लोकअदालतीत तडजोडीस पात्र दिवाणी व फौजदारी मामल्यांसह इतर मामल्यांमध्ये ८९ प्रलंबित आणि ४१४ दाखलपूर्व प्रकरणे आपसी तडजोडीने निकाली काढण्यात आली. त्यात २ कोटी १२ लाख ६६ हजार ९५० रुपयांची वसुली संबंधितांना मिळाली. किरकोळ स्वरूपाच्या मामल्यांकरिता स्पेशल ड्राईव्हद्वारे २६ प्रकरणे निकाली काढली.

 

टॅग्स :Lokadalatलोकअदालत