१८ मृत्यूंसह ५८६ नवीन कोरोनाबाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:39 AM2021-05-06T04:39:18+5:302021-05-06T04:39:18+5:30

दिवसभरात २५१ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्ह्यातील आतापर्यंत बाधित २३५९८ पैकी कोरोनामुक्त ...

586 new corona infected with 18 deaths | १८ मृत्यूंसह ५८६ नवीन कोरोनाबाधित

१८ मृत्यूंसह ५८६ नवीन कोरोनाबाधित

Next

दिवसभरात २५१ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्ह्यातील आतापर्यंत बाधित २३५९८ पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या १८५३५ वर पोहचली. तसेच सध्या ४५८० सक्रिय कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात एकूण ४८३ जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. बुधवारी १८ नवीन मृत्यूंमध्ये ६१ वर्षीय पुरुष आरमोरी, ५५ वर्षीय महिला कुनघाडा, ता. चामोर्शी, ७० वर्षीय पुरुष पारडी गडचिरोली, ६६ वर्षीय पुरुष बेडगाव, ता. कोरची, ५७ वर्षीय महिला मीचगाव, ता. धानोरा, ४४ वर्षीय पुरुष बोधलदंड ता. कोरची, ५३ वर्षीय पुरुष चामोर्शी, ४२ वर्षीय पुरुष ता. लाखांदूर, जि. भंडारा, ५६ वर्षीय महिला डोंगरतमाशी ता. आरमोरी, ५८ वर्षीय पुरुष, ता. लाखांदूर जि. भंडारा, ५२ वर्षीय पुरुष शिरपूर ता. कुरखेडा, ६७ वर्षीय पुरुष आरमोरी, ७८ वर्षीय महिला वडसा, ६५ वर्षीय पुरुष खुदीरामपल्ली ता. मुलचेरा, ६७ वर्षीय महिला ता. ब्रह्मपुरी जि.चंद्रपूर, ५९ वर्षीय पुरुष आरमोरी,५३ वर्षीय पुरुष गिलगाव ता.चामोर्शी,४५ वर्षीय महिला नवेगाव गडचिरोली यांचा नवीन मृत्यूमध्ये समावेश आहे. यामुळे जिल्ह्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७८.५४ टक्के, सक्रिय रुग्णांचे प्रमाण १९.४१ टक्के तर मृत्यू दर २.५ टक्के झाला.

नवीन ५८६ बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील २११, अहेरी तालुक्यातील ६७, आरमोरी ३२, भामरागड तालुक्यातील ६, चामोर्शी तालुक्यातील ३७, धानोरा तालुक्यातील १९, एटापल्ली तालुक्यातील ४४, कोरची तालुक्यातील १७, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये २८, मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये २२, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये ३२ तर वडसा तालुक्यातील बाधितांमध्ये ७१ जणांचा समावेश आहे. तर आज कोरोनामुक्त झालेल्या २५१ रूग्णांमध्ये गडचिरोलीमधील १६०, अहेरी १०९, आरमोरी २३, भामरागड ८, चामोर्शी १४, धानोरा ७, एटापल्ली १, मुलचेरा ३, सिरोंचा ११, कुरखेडा ११, तसेच देसाईगंज येथील ४ जणांचा समावेश आहे.

Web Title: 586 new corona infected with 18 deaths

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.