सध्या ४ हजार ३६६ सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. एकूण ३५१ जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. १६ नवीन मृत्यूमध्ये
आरमोरी, जि. गडचिरोली येथील ६९ वर्षीय पुरुष, चामोर्शी येथील ४० वर्षीय पुरुष, कुरखेडा येथील ८० वर्षीय पुरुष, सिरोंचा येथील ७५ वर्षीय पुरुष, गडचिरोली येथील ६५ वर्षीय महिला, धानोरा येथील ६६ वर्षीय पुरुष, देसाईगंज येथील ६० वर्षीय पुरुष, आरमोरी रोड, गडचिरोली येथील ३८ वर्षीय पुरुष, अहेरी, जि. गडचिरोली येथील ६८ वर्षीय पुरुष, नागभीड, जि. चंद्रपूर येथील ५३ वर्षीय पुरुष, गडचिरोली येथील ५६ वर्षीय पुरुष, कुरखेडा येथील ३० वर्षीय महिला, कुरखेडा येथील ६५ वर्षीय पुरुष, गडचिरोली येथील ७४ वर्षीय महिला, धानोरा येथील ५५ वर्षीय पुरुष, गडचिरोली येथील ५२ वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.
नवीन ५५८ बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील १६८, अहेरी ५३, आरमोरी ५४, चामोर्शी ८२, धानोरा ११, एटापल्ली १, कोरची
५०, कुरखेडा बाधितांमध्ये ५८, मुलचेरा १३, तर देसाईगंज तालुक्यातील बाधितांमध्ये ६८ जणांचा समावेश आहे. कोरोनामुक्त
झालेल्या ५१२ रुग्णांमध्ये गडचिरोलीमधील १६३, अहेरी ३१, आरमोरी ३७, भामरागड १९, चामोर्शी ३०, धानोरा
२७, एटापल्ली १६, मुलचेरा १३, सिरोंचा २०, कोरची ३०, कुरखेडा ३८, तसेच देसाईगंज येथील ८८ जणांचा समावेश
आहे.