शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
5
चोरीच्या आरोपाखाली महिलेला दिली थर्ड डिग्री, पोलिसांवर गुन्हा दाखल 
6
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
7
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
8
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
9
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
10
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
11
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
12
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
13
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
14
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
17
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
18
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार

५० हजारांवर भाविक गडचिरोलीत येणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2019 5:00 AM

जिलानीबाबा जन्मोत्सव सोहळ्याचा प्रारंभ १८ नोव्हेंबर रोजी सोमवारपासून होत आहे. आज दुपारी धार्मिक प्रचवन तसेच धार्मिक ग्रंथाचे पठन करण्यात येणार आहे. रात्री ९ वाजता प्रवचनाचा कार्यक्रम होणार आहे. १९ नोव्हेंबर रोजी मंगळवारला सकाळी ९ वाजता परचम कुशाई व फातेहा ख्वानी अर्थात झेंडावंदन होणार आहे.

आजपासून उत्सवास प्रारंभ : ट्रस्टच्यावतीने जिलानी बाबाच्या जन्मोत्सव सोहळ्याची जय्यत तयारीलोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : हजरत सय्यद अहमद जिलानी (बाबा) च्या जन्मोत्सव सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर सय्यद अहमद जिलानी बाबा ट्रस्ट गडचिरोलीच्या वतीने येथे दरवर्षी विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. स्थानिक रामनगरात होणाऱ्या या दोनदिवसीय कार्यक्रमासाठी महाराष्ट्रासह पाच राज्यातील ५० हजारांवर भाविक हजेरी लावतात. जिलानी बाबाच्या जन्मोत्सव सोहळ्याची तयारी ट्रस्टच्या वतीने पूर्ण करण्यात आली आहेजिलानीबाबा जन्मोत्सव सोहळ्याचा प्रारंभ १८ नोव्हेंबर रोजी सोमवारपासून होत आहे. आज दुपारी धार्मिक प्रचवन तसेच धार्मिक ग्रंथाचे पठन करण्यात येणार आहे. रात्री ९ वाजता प्रवचनाचा कार्यक्रम होणार आहे. १९ नोव्हेंबर रोजी मंगळवारला सकाळी ९ वाजता परचम कुशाई व फातेहा ख्वानी अर्थात झेंडावंदन होणार आहे. त्यानंतर सकाळी ९.३० वाजता जिलानी बाबाचा गडचिरोली शहरातून शाही जुलूस काढण्यात येणार आहे. त्यानंतर ११.३० वाजता बाबांची गुलपोशी करण्यात येणार आहे. दुपारी १२.३० वाजता फैजे लंगर (महाप्रसादाचा) कार्यक्रम पार पडणार आहे. रात्री ९ वाजता गुलाम वारीस व जुनेद सुलतानी यांचा दुरंगी कवाली मुकाबला होणार आहे. पोटेगाव मार्गावरील खुल्या मैदानात सदर जन्मोत्सव सोहळा कवाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आली आहे. त्यादृष्टीने जिलानी बाबा ट्रस्टच्या वतीने संपूर्ण तयारी करण्यात आली असून भाविकांसाठी विविध सोयीसुविधा उपलब्ध राहणार आहेत.सदर जन्मोत्सव सोहळ्याला महाराष्ट्रातील मुस्लिम तसेच सर्व धर्मीय बांधव मोठ्या संख्येने हजेरी लावणार आहेत. कार्यक्रमस्थळी शाही मंडप टाकण्यात आला असून विद्युतीकरण करण्यात आले आहे. गडचिरोली शहरातीलही हजारो भाविक येथे हजेरी लावणार आहेत. सदर कार्यक्रमस्थळी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर बॅरिकेट्स लावण्यात आले आहेत. संपूर्ण पोटेगाव मार्गावर तोरण व विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. सोमवारी दुपारपासून येथे भाविक दाखल होत असून मंगळवारी येथे हजारोंची गर्दी होणार आहे.भाविकांचे जत्थे व दुकानदार दाखलहजरत सय्यद अहमद जिलानी बाबाच्या जन्मोत्सव सोहळ्यासाठी प्रामुख्याने महाराष्ट्र, छत्तीसगड, मध्यप्रदेश या तीन राज्यातील भाविक मोठ्या संख्येने दाखल होणार आहेत. याशिवाय आंध्रप्रदेश व तेलंगणातूनही भाविक येणार आहेत. सोमवारी सकाळपासून दूरवरचे बरेच भाविक कार्यक्रमस्थळी दाखल झाले. गडचिरोली जिल्ह्यासह इतर भागातील अनेक दुकानदारांनी येथे हजेरी लावली आहे. व्यवसायाच्या निमित्ताने येथे आलेले लोक आपले दुकान लावत असल्याचे सोमवारी दुपारच्या सुमारास दिसून आले. कपडे, महिला व मुलींचे साहित्य, मुला, मुलींच्या खेळणी व इतर सर्व वस्तूंची दुकाने येथे लागणार आहेत. कोणत्याही व्यवसायिकाची तसेच भाविकांची गैरसोय होऊ नये, यादृष्टीने जिलानी बाबा ट्रस्टच्या वतीने नियोजन करण्यात आले आहे. व्यवसायासाठी आलेल्या दुकानदारांना जागा निश्चित करून दिली जात आहे.जिल्हा स्टेडियम व पोटेगाव बायपास मार्गावर वाहन पार्र्किं गची व्यवस्थाविदर्भासह महाराष्ट्र तसेच आंध्रप्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड, मध्यप्रदेश राज्यातून हजारो भाविक जिलानी बाबाच्या जन्मोत्सव सोहळ्यासाठी हजेरी लावतात. चारचाकी वाहनाने भाविक येथे येत असतात. भाविकांच्या वाहनांसाठी पार्र्किं गची व्यवस्था जिल्हा स्टेडियमवर तसेच पोटेगाव मार्गावर दूरवर तसेच खुल्या जागेत करण्यात आली आहे, अशी माहिती जिलानी बाबा ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.

टॅग्स :Socialसामाजिक