शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

हत्तींचा धुमाकूळ, ट्रॅक्टरमधील ५० पोते धान केला मातीमोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2023 15:22 IST

चांभार्डात हैदोस : तोंडचा घास घेतला हिरावून

गडचिराेली : धान कापणीसह बांधणी व मळणीचे काम जाेमात सुरू आहे. वडसा वन विभागातही शेतकरी धानाची कापणी, बांधणी व मळणीचे काम करीत आहेत. अशातच गेल्या महिनाभरापासून आरमाेरी तालुक्याच्या वडधा, गडचिराेली तालुक्याच्या माैशिखांब व धानाेरा तालुक्याच्या रांगी परिसरात रानटी हत्तींचा धुडगूस सुरूच आहे.

मंगळवारी रानटी हत्तींनी चांभार्डा खैरी रिठ येथील एका शेतकऱ्याने शेतात ट्रॅक्टर ट्राॅलीमध्ये ठेवलेल्या ५० पाेती धानाची नासधूस रात्रीच्या सुमारास केली. गडचिराेली तालुक्याच्या चांभार्डा येथील शेतकरी उमाजी चनेकार यांनी ठेकापद्धतीने केलेल्या शेतातील धानाची मळणी मंगळवारी दुपारच्या सुमारास केली. ५० पाेती धानाची मळणी करण्यास सायंकाळच झाली. धानाचे पाेती ट्रॅक्टर ट्राॅलीमध्ये आणत असतानाच दुसऱ्याच बांधीत ट्राॅली फसली.

फसलेली ट्राॅली काढण्याचा प्रयत्न शेतकऱ्यासह अन्य मजुरांनी केला. यासाठी दुसरे ट्रॅक्टरसुद्धा बाेलावले. याच प्रयत्नात अंधार झाला. दरम्यान, डाेंगराच्या मार्गाने रानटी हत्ती जाेरजाेरात ओरडत येऊ लागले. तेव्हा कसाबसा आपला जीव वाचावा यासाठी उमाजी चनेकार यांच्यासह त्यांची दाेन्ही मुले व अन्य मजुरांनी शेतातून काढता पाय घेतला. रात्री ८:३० ते ९ वाजताच्या सुमारास रानटी हत्ती शेतात दाखल झाले व हत्तींनी संपूर्ण रात्रभर ट्राॅलीत दाेरखंडाने बांधलेले संपूर्ण ५० पाेती धानाची नासधूस केली. यात शेतकऱ्याचे १ लाख रुपयांवर नुकसान झाले.

चाेहीकडे पसरवले धानाचे पाेते

रानटी हत्तींच्या कळपाने ट्राॅली ठेवलेल्या बांधीपासून जवळपासच्या चार ते पाच बांध्यांमध्ये धानाचे पाेती पसरवली हाेती. प्लास्टिक धाग्यांच्या पाेत्याची जणूकाही चिरफाड हत्तींनी केली. त्यामुळे दाेन ते तीन बांध्यांमध्ये धान पसरले हाेते.

कळपाकडून रात्रभर धुडगूस

रानटी हत्तींनी उमाजी चनेकार यांच्या शेतात रात्रभर धुडगूस माजविला. सकाळच्या सुमारास जेव्हा चनेकार यांची मुले व काही लाेक शेतात गेले असता त्यांना हत्तींचा कळप धान खाण्यात दंग असल्याचा दिसून आला.

शासनाच्या जीआरनुसार शेतातील उभ्या धान पिकाचीच नुकसानभरपाई देता येते. तरीसुद्धा संबंधित शेतकऱ्याला भरपाई देण्यासंदर्भात पावले उचलली जातील. शेतकऱ्याला ऑनलाइन अर्ज भरावा लागेल. त्यानंतर वन कर्मचाऱ्यांकडून पंचनाम्याची कार्यवाही केली जाईल.

- धर्मवीर सालविठ्ठल, उपवनसंरक्षक वनविभाग वडसा

टॅग्स :PaddyभातAgriculture Sectorशेती क्षेत्रwildlifeवन्यजीवGadchiroliगडचिरोली