शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
2
"कुराणची शपथ घेऊन सांगतो, भाजप...!" मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचा मोठा दावा, राजकारण तापलं
3
“टॅरिफला विरोध करणारे मूर्ख, आम्ही अमेरिकेला श्रीमंत केले, इथे महागाई नाही”: डोनाल्ड ट्रम्प
4
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
5
जडेजा-सॅमसनच्या 'डील'मध्ये डेवाल्ड ब्रेव्हिसचा अडथळा, आयपीएलमध्ये चेन्नई, राजस्थान यांच्यात खेळाडूंची अदलाबदली होण्याची शक्यता
6
Kalbhairav Jayanti 2025: बुधवार १२ नोव्हेंबर कालभैरव जयंती; शिवाचे हे उग्ररूप कशासाठी?
7
बिहारमध्ये योगी आदित्यनाथ यांचा झंझावात, १० दिवसांत ३१ रॅली; काँग्रेस आणि RJD वर घणाघात
8
'नीट'च्या दोन मार्कलिस्ट अन् विद्यार्थिनीला धक्का, पालकही चिंताग्रस्त; कुटुंब निराशेच्या गर्तेत
9
विद्यापीठात पॉलिमर केमिस्ट्री प्रयोगशाळा; संशोधकांना मिळेल प्रेरणा, विकासात योगदान
10
आजचा अग्रलेख: भारतीयांची क्षमता जोखा, साखर नको!
11
परराज्यातील मुलांना एमबीबीएसला प्रवेश घेण्याची मुभा द्या, पालघरच्या कॉलेजने घेतली उच्च न्यायालयात धाव
12
कपड्यांवरुन होणाऱ्या ट्रोलिंगवर पहिल्यांदाच बोलल्या अमृता फडणवीस, म्हणाल्या- "मला वाईट वाटतं, पण..."
13
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
14
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
15
एक दिवस CM बनवलं तर काय कराल? अमृता फडणवीस म्हणाल्या- "मी देवेंद्रजींना..."
16
१२ वर्षांनी शतांक गजकेसरी योग: ८ राशींना लॉटरी, इच्छापूर्ती; नवीन नोकरी, अकल्पनीय पैसा-लाभ!
17
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
18
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
19
मराठी अभिनेता दुसऱ्यांदा होणार बाबा, पार पडलं पत्नीचं बेबी शॉवर; अरुण गवळीच्या मुलीसोबत थाटलाय संसार
20
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."

सोयीसुविधांसाठी ३७ टक्के वाढीव तरतूद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 01:15 IST

गडचिरोली शहराचा अर्थसंकल्प गुरूवारी सादर करण्यात आला. या अर्थसंकल्पात मागील वर्षीच्या तुलनेत नागरिकांना सोयीसुविधा पुरविण्यासाठी ३७ वाढीव तरतूद करण्यात आली आहे.

ठळक मुद्देगडचिरोली शहराचा अर्थसंकल्प : १५ कोटी ३३ लाख १७ हजारांचा निधी; शहराच्या विकासाला मिळणार गती

ऑनलाईन लोकमतगडचिरोली : गडचिरोली शहराचा अर्थसंकल्प गुरूवारी सादर करण्यात आला. या अर्थसंकल्पात मागील वर्षीच्या तुलनेत नागरिकांना सोयीसुविधा पुरविण्यासाठी ३७ वाढीव तरतूद करण्यात आली आहे.शहरवासीयांना आरोग्य, पाणीपुरवठा, रस्ते, शिक्षण आदी सोयीसुविधा पुरविणे ही नगर परिषदेची जबाबदारी आहे. आरोग्य व सोयीसुविधांसाठी मागील चार वर्षांच्या तुलनेत यावर्षी भरीव तरतूद करण्यात आली आहे. २०१५-१६ मध्ये आरोग्य व सोयीसुविधांवर केवळ ३ कोटी १४ लाख ४१ हजार रूपयांची तरतूद होती. २०१६-१७ मध्ये ५ कोटी २८ लाख ७४ हजार व २०१७-१८ मध्ये ११ कोटी २१ लाख २२ हजार रूपयांची तरतूद करण्यात आली होती. २०१८-१९ या आर्थिक वर्षासाठी १५ कोटी ३३ लाख १७ हजार रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये शहरातील हातपंप व पाईपलाईन लिकेज दुरूस्तीसाठी ३० लाख रूपये, नवीन पाईपलाईन टाकण्यासाठी १० लाख रूपये, पाणीपुरवठा योजनेला आलम खरेदी करण्यासाठी सात लाख, ब्लिचिंग पावडर खरेदीसाठी आठ लाख रूपये, १४ व्या वित्त आयोगाअंतर्गत वॉटर वर्क, वीज बिल दुरूस्तीसाठी ८० लाख रूपये, सार्वजनिक विहिरींची सफाई व दुरूस्तीसाठी १ लाख २५ हजार रूपये, जलशुद्धीकरण केंद्राच्या बांधकामासाठी महाराष्टÑ जीवन प्राधिकरणकडून नगर परिषदेने कर्ज घेतले. या कर्जाची परतफेड करण्यासाठी सुमारे १ कोटी रूपयांची तरतूद केली आहे. पंप दुरूस्तीसाठी २० लाख रूपये, फिल्टर दुरूस्तीसाठी ३ लाख ५० हजार रूपये, भूमीगत गटार योजनेच्या प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार शुल्कासाठी एक कोटी रूपयांची तरतूद झाली आहे. पाणीपुरवठा विभागावर सुमारे ४ कोटी १५ लाख ९० हजार रूपये खर्च होणार आहेत.साफसफाईवर एकूण ५ कोटी ४८ लाख ९५ हजार रूपयांचा खर्च होणार आहे. यामध्ये वाहनांच्या दुरूस्तीसाठी ६ लाख ५० हजार, पेट्रोल, डिझेलसाठी चार लाख, पाणपोई निर्मितीसाठी १ लाख १० हजार, स्वच्छ महाराष्टÑ अभियानासाठी दोन लाख रूपये, आपत्ती व्यवस्थापनासाठी १ लाख ५० हजार रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. मोकाट व पिसाळलेल्या कुत्र्यांची नसबंदीसाठी १० हजार रूपये, दुर्बल घटकांना अंत्यसंस्कारासाठी लाकडे पुरविण्यासाठी ५० हजार रूपये, शहरातील रस्त्यांच्या बाजूला असलेले निरूपयोगी झाडे कापण्यासाठी पाच लाख रूपये, नागरिकांना कचरापेटीचे वितरण करण्यासाठी पाच लाख रूपयांची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.दिवाबत्तीसाठी १ कोटी ८८ लाखांची तरतूदशहरातील पथदिव्यांच्या दुरूस्ती व इतर खर्चासाठी सन २०१८-१९ मध्ये सुमारे १ कोटी ८८ लाख १६ हजार १०० रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. शहराचा विस्तार होत आहे. त्याचबरोबर पथदिव्यांची संख्या तसेच विद्युत पुरवठा करणाऱ्या वीज वाहिनीची लांबी वाढत चालली आहे. तसतसा दिवाबत्तीवरील खर्च वाढत चालला आहे. दिवे व इतर वस्तू खरेदीसाठी १५ लाख रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. वीज खांब व इतर खर्चासाठी १ लाख रूपये, पथदिव्यांचा वीज बिल भरण्यासाठी ८० लाख रूपये, विद्युत देखभाल व दुरूस्तीसाठी ३५ लाख रूपये, जनरेटर दुरूस्ती व डिझेलसाठी एक लाख रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. स्थायी आस्थपनेवर ५० लाख, अस्थायी स्थापनेवर तीन लाख रूपयांची तरतूद करण्यात आले आहे.सार्वजनिक उद्यानांसाठी ७१ लाखशहरातील काही ओपन स्पेसवर बगीचे तयार करण्यात आले आहेत. त्याचबरोबर इतर ओपन स्पेसचा विकास करण्यासाठी एकूण ७१ लाख २० हजार रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये स्थायी आस्थापनेवर ३५ लाख १० हजार, वृक्षारोपन व ट्रीगार्ड खरेदीसाठी १० लाख रूपये, सौंदर्यीकरण व नगर उद्यानसाठी १५ लाख रूपये, कीटकनाशक खरेदीसाठी ६० हजार रूपये, लहान मुलांना खेळणे खरेदीसाठी पाच लाख रूपये, गार्डन चेअर खरेदीसाठी पाच लाख रूपयांची तरतूद करण्यात आली आहे.अपंगांसाठी तीन टक्के, अनुसूचित जाती व जमातीसाठी प्रत्येकी पाच टक्के निधी आरक्षित ठेवावा लागतो. त्यानुसार अपंगांसाठी १ कोटी ५५ लाख, अनुसूचित जाती व जमातीसाठी प्रत्येकी २ कोटी ५८ लाखांचा निधी आरक्षित केला आहे.