३५ जणांनी केले रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:25 AM2021-06-17T04:25:38+5:302021-06-17T04:25:38+5:30

देसाईगंज : जागतिक रक्तदाता दिनाचे औचित्य साधून देसाईगंज येथील छत्रपती शिवाजी क्लब व गडचिरोली येथील स्वयं रक्तदाता समितीच्या वतीने ...

35 people donated blood | ३५ जणांनी केले रक्तदान

३५ जणांनी केले रक्तदान

googlenewsNext

देसाईगंज : जागतिक रक्तदाता दिनाचे औचित्य साधून देसाईगंज येथील छत्रपती शिवाजी क्लब व गडचिरोली येथील स्वयं रक्तदाता समितीच्या वतीने आयोजित रक्तदान एकूण ३५ जणांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकीचा परिचय दिला.

कोरोना विषाणूच्या पार्श्र्वभूमीवर जिल्ह्याच्या रक्तपेढीत निर्माण झालेला रक्ताचा तुटवडा व गरजूंना रक्ताची गरज लक्षात घेता देसाईगंज येथील ग्रामीण रुग्णालयात रक्तदान शिबिर घेण्यात आले. रक्तदान करणाऱ्यांमध्ये टायगर युवामंच गृप व जगदंबा युवा मंचच्या कार्यकर्त्यांचा समावेश आहे. सोबतच काही शिक्षकांचा देखील समावेश आहे. शिबिराच्या यशस्वितेसाठी शिवाजी क्लबचे अध्यक्ष सागर वाढई, राष्ट्रवादी काँग्रेसचे भुवन लिल्हारे, स्वयं रक्तदाता समितीचे अध्यक्ष चारुदत्त राऊत, टायगर युवा ग्रुपचे प्रमुख शरद राऊत यांनी सहकार्य केले. याप्रसंगी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डाॅ. अविनाश मिसार, वैद्यकीय अधिकारी डाॅ. प्रणय कोसे आदी उपस्थित हाेते.

160621/img-20210614-wa0018.jpg

रक्तदान करतांना शिवाजी क्लबचे सदस्य

Web Title: 35 people donated blood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.