जिल्ह्यात आठ मृत्यूसह नवीन ३०५ कोरोनाबाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:35 IST2021-04-15T04:35:27+5:302021-04-15T04:35:27+5:30

जिल्ह्यातील आत्तापर्यंत बाधित १३,२५७ पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या १०,९२४ वर पोहचली. तसेच सध्या २१६८ सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू ...

305 new corona affected with eight deaths in the district | जिल्ह्यात आठ मृत्यूसह नवीन ३०५ कोरोनाबाधित

जिल्ह्यात आठ मृत्यूसह नवीन ३०५ कोरोनाबाधित

जिल्ह्यातील आत्तापर्यंत बाधित १३,२५७ पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या १०,९२४ वर पोहचली. तसेच सध्या २१६८ सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्ह्यात एकूण १६५ जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. आज बुधवारी ८ नवीन मृत्यूंमध्ये सावरगाव, ता. चिमूर जि. चंद्रपूर येथील ६९ वर्षीय पुरुष, तर गडचिरोली तालुक्यातील ४६ वर्षीय महिला, तालुका आरमोरी जि. गडचिरोली येथील ५१ वर्षीय पुरुष, तालुका ब्रह्मपुरी जि. चंद्रपूर येथील ६० वर्षीय महिला, तालुका अहेरी जि. गडचिरोली येथील ६१ वर्षीय पुरुष, ता. भामरागड जि. गडचिरोली येथील ५२ वर्षीय पुरुष, नागपूर जिल्ह्यातील ८६ वर्षीय महिला तसेच ता. आरमोरी जि. गडचिरोली येथील प्रीटर्म बेबी यांचा समावेश आहे. यामुळे जिल्ह्यातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण ८२.४० टक्के, सक्रिय रुग्णांचे प्रमाण १६.३५ टक्के तर मृत्यदर १.२४ टक्के झाला आहे.

नवीन ३०५ बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील १४९, अहेरी तालुक्यातील ६, आरमोरी २८, भामरागड तालुक्यातील ५, चामोर्शी तालुक्यातील १२, धानोरा तालुक्यातील १०, एटापल्ली तालुक्यातील १०, कोरची तालुक्यातील १२, कुरखेडा तालुक्यातील बाधितांमध्ये १९, मुलचेरा तालुक्यातील बाधितांमध्ये ३, सिरोंचा तालुक्यातील बाधितांमध्ये ३ तर वडसा तालुक्यातील बाधितांमध्ये ४८ जणांचा समावेश आहे. तर आज कोरोनामुक्त झालेल्या ७१ रूग्णांमध्ये गडचिरोलीमधील ४६, अहेरी १, चामोर्शी २, धानोरा १, मुलचेरा १,सिरोंचा १४, कोरची २, कुरखेडा २, तसेच वडसा २ येथील जणाचा समावेश आहे.

Web Title: 305 new corona affected with eight deaths in the district