शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

मरपल्लीत ३० लाखांचा शौचालय घोटाळा उघड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2018 01:19 IST

अहेरी तालुक्यातील मरपल्ली ग्रामपंचायतीचे तत्कालीन ग्रामसेवक एच. एस. भारूडे यांनी सुमारे २९ लाख ५२ हजार ७४० रूपयांचा घोटाळा केला आहे. अहेरीचे पंचायत समितीचे पंचायत विस्तार अधिकारी यांनी केलेल्या चौकशीत सदर घोटाळा उघड झाला आहे.

ठळक मुद्देचौकशी अहवालात स्पष्ट : तत्कालीन ग्रामसेवकाचा प्रताप

लोकमत न्यूज नेटवर्कजिमलगट्टा : अहेरी तालुक्यातील मरपल्ली ग्रामपंचायतीचे तत्कालीन ग्रामसेवक एच. एस. भारूडे यांनी सुमारे २९ लाख ५२ हजार ७४० रूपयांचा घोटाळा केला आहे. अहेरीचे पंचायत समितीचे पंचायत विस्तार अधिकारी यांनी केलेल्या चौकशीत सदर घोटाळा उघड झाला आहे.मरपल्ली ग्रामपंचायतीत शौचालय बांधकामात गैरव्यवहार झाला असून याची चौकशी करावी, अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य यशवंत डोंगरे यांनी कोत्तागुडम पोलीस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी यांच्याकडे केली होती. त्यानुसार विस्तार अधिकारी यांनी ३१ मे ते १ जून २०१८ या कालावधीत प्रत्यक्ष बांधकामाची पाहणी केली. पाहणीदरम्यान मरपल्ली ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या करंचा व भस्वापूर येथील एकूण ११५ शौचालये आराखड्यानुसार बांधण्यात आली नाही. नियमानुसार दोन खड्ड्यांचे खोदकाम व बांधकाम झाले नाही. फक्त जागेवरूनच शौचालयाच्या भिंती उचलण्यात आल्या आहेत. शौचालयांना दरवाजे नाहीत. सिट बसविली आहे, परंतु छत नाही. सर्व शौचालय अपूर्णावस्थेत आढळली. मरपल्ली व कोतागुडम या गावांमध्ये कोणतेही बांधकाम झाले नाही. लाभार्थी स्वत: बांधकाम करण्यास इच्छुक असतानाही ग्रामसेवक भारूडे यांनी स्वत:च रेतीचा व साहित्याचा पुरवठा केला, परंतु बांधकाम सुरू केले नाही, अशी माहिती लाभार्थ्यांनी दिली.बांधकामासंदर्भातील आवश्यक दस्तावेज सादर करण्याचे निर्देश भारूडे यांना देऊन सुध्दा त्यांनी साहित्य खरेदीचे देयके, प्रमाणके, साठाबंदी व नमुना-२२ व इतर कोणतेही दस्तावेज सादर केले नाहीत. भारूडे यांनी नियमबाह्यपणे स्वत:च सिमेंट, रेती, विटा, दरवाजे, सिट आदी साहित्य खरेदी केले. खरेदी केलेल्या साहित्याची साठापंजीमध्ये नोंद नाही. कोणतेही बिल न घेताच बालाजी ट्रेडर्स, रोहित ट्रेडर्स, कल्याणी ट्रेडर्स, राकेश ट्रेडर्स या पुरवठाधारकांना २५ लाख ५५ हजार ४४० रूपयांचे धनादेश प्रदान केले आहे. मजुरीवर ३ लाख ९७ हजार ३०० रूपयांचा खर्च दाखविला आहे. परंतु मजुरी वाटपाचे नमुना-२२ सादर केले नाही. यावरून केलेला खर्च नियमबाह्य आहे. भारूडे यांनी २९ लाख ५२ हजार ७४० रूपयांच्या रकमेची अफरातफर केल्याचे सिध्द होत असल्याने त्यांच्या विरूध्द शासन निर्णयानुसार कारवाई प्रस्तावित करावी, असे चौकशी अहवालात म्हटले आहे.चौकशी न करताच ग्रामपंचायतीला दिला निधीभारूडे यांनी २४९ शौचालयांची बांधकामे पूर्ण दाखवून निधीची मागणी केली. निधी प्रस्तावासोबत लाभार्थ्यांची यादी सादर केली नाही. संख्या दाखवून प्रस्ताव सादर केला. तरीही अहेरीच्या गट समन्वयकांनी २९ लाख ८८ हजार रूपयांची देयके सहा टप्प्यात वितरित केली. प्रत्यक्षात शौचालय बांधकामाची पाहणी करूनच निधीचे वितरण करणे ही जबाबदारी समूह समन्वयक व गट समन्वयक यांची होती. मात्र त्यांनी चौकशी न करताच निधी दिला.मरपल्ली ग्रामपंचायत अंतर्गत शौचालय बांधकामात गैरव्यवहार झाला आहे. यामध्ये ग्रामसेवकासह सरपंच सुध्दा जबाबदार आहेत. चौकशी अहवाल मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे आजच पाठविला आहे. त्यांच्याकडून उत्तर आल्यानंतर ग्रामसेवक व सरपंच या दोघांविरोधातही एफआयआर दाखल केला जाईल.-प्रफुल्ल म्हैसकर,संवर्ग विकास अधिकारी, अहेरी

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायत