शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

गडचिराेली जिल्ह्यात २९२ मतदारांनी ओलांडली वयाची शंभरी

By गेापाल लाजुरकर | Updated: June 19, 2023 21:18 IST

गडचिराेली विधानसभा क्षेत्रात सर्वाधिक ज्येष्ठांचा भरणा

गडचिराेली : पुढील वर्षीच्या संभाव्य निवडणुकीच्या दृष्टीने निवडणूक विभागाने मतदार याद्या पुनरीक्षणाचा कार्यक्रम जाहीर केला आहे. सदर कार्यक्रमानुसार जिल्ह्यातील विधानसभा क्षेत्रनिहाय मतदारांची संख्या, वाेटिंग कार्ड-आधार कार्ड लिंक करणे यासह जिल्ह्यातील मतदार यादीतील ८० वर्षे वयावरील मतदारांची संख्या जाहीर केली.

त्यानुसार १५ जून २०२३ पर्यंत जिल्ह्यात १८ हजार ८२४ मतदार ८० वर्षांहून अधिक वयाची आहेत. विशेष म्हणजे, २९२ मतदारांनी वयाची शंभरी ओलांडली आहे. जिल्ह्यात आरमाेरी, गडचिराेली व अहेरी असे तीन विधानसभा क्षेत्र आहेत. विधानसभेचे तिन्ही क्षेत्र अनुसूचित जमातीसाठी राखिव आहेत.

तीन हजार मतदार नव्वदी पारजिल्ह्यात ९० ते ९९ वर्षे ह्या वयाेगटातील मतदारांची संख्या २ हजार ९९७ आहे. आरमाेरी विधानसभा क्षेत्रात ८२१, गडचिराे क्षेत्रात १ हजार २९४ तर अहेरी विधानसभा क्षेत्रातील ८८२ मतदारांनी वयाची नव्वदी ओलांडली. सर्वाधिक ज्येष्ठ मतदार गडचिराेली विधानसभा क्षेत्रात आहेत. शंभरी ओलांडलेल्या सर्वाधिक ११६ मतदारांची संख्यासुद्धा याच क्षेत्रात आहे.

८० वर्षांवरील जिल्ह्यातील एकूण मतदार

विधानसभा क्षेत्र        वय ८०-८९    वय ९०-९९    वय १०० वरील    एकूण मतदार

आरमाेरी                ४,६५६            ८२१         ७५                 ५,५५२

गडचिराेली               ६,२३९          १,२९४      ११६                 ७,६४९

अहेरी                    ४,६४०          ८८२       १०१                  ५,६२३                   एकूण                   १५,५३५         २,९९७    २९२                   १८,८२४

टॅग्स :GadchiroliगडचिरोलीElectionनिवडणूक