शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक गरिबांचा, तर दुसरा श्रीमंतांचा; दोन देश निर्माण केले', राहुल गांधींचा PM मोदींवर निशाणा
2
सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठी घसरण, Silver ₹३५०० तर Gold किती रुपयांनी झालं स्वस्त?
3
DSP Rishikant Shukla: दहा वर्षांच्या सेवेतच जमवली १०० कोटींची माया; एक दोन नव्हे, तब्बल १२ भूखंड, ११ दुकाने अन्...
4
पत्नीने दिला जुळ्यां मुलांना जन्म, पती म्हणाला, ही माझी मुलंच नाहीत, जोरदार राडा, अखेरीस समोर आलं वेगळंच सत्य
5
बाजारात खळबळ! Hyundai ने ₹७.९० लाखात लाँच केली नवीन 'व्हेन्यू २०२५'; जबरदस्त फीचर्स आणि ADAS सह एंट्री
6
दीड वर्षांपूर्वीच्या पल्लेदार कौशल हत्येचा पर्दाफाश! बायकोच्या 'डबल गेम'ने पोलीसही हादरले
7
मैदान गाजवले, आता ब्रँड व्हॅल्यूही वाढली! महिला क्रिकेटपटूंच्या कमाईत दुप्पट वाढ; सर्वाधिक फी कोणाची?
8
पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टात मोठा स्फोट! इस्लामाबादमध्ये खळबळ; बेसमेंटमध्ये झालेल्या ब्लास्टने इमारतीला हादरवले
9
"हा देश राम-सीता यांचा, लादेनचा नाही; या छोट्या ओसामाला..."; बिहारमध्ये हिमंत बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल
10
Election: निवडणुकीच्या प्रचारात शब्द जपून वापरा नाही तर...; केंद्रीय मंत्र्याविरोधात गुन्हा दाखल
11
Demat अकाऊंटमध्ये ४३ कोटी ठेवणारे डॉक्टर व्हायरल; झिरोदाला म्हटलं स्कॅम; कामथ काय म्हणाले?
12
देशातील १ टक्के श्रीमंत लोकांच्या संपत्तीत ६२ टक्क्यांनी वाढ; हैराण करणारा रिपोर्ट आला समोर
13
राज्य मंत्रिमंडळाचे २१ 'जम्बो निर्णय'; आचारसंहितेपूर्वी महायुती सरकारचा घोषणांचा धमाका
14
आयसीसीनं लॉरावर केली मर्जी बहाल! वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतवर अन्याय?
15
उत्पन्न वाढीसाठी एसटी रिटेल इंधन विक्री करणार, निविदा प्रक्रिया सुरू, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली माहिती 
16
एअर इंडियाच्या विमानात गडबड! दिल्लीहून बांगळुरूला जाणाऱ्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग
17
Relationship Tips: भांडणानंतर बायको रडत राहते आणि नवरा झोपी जातो, असे का?
18
महिला क्रिकेट विश्वचषक विजेत्या राज्यातील खेळाडूंना रोख पारितोषिक, सत्कार होणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा
19
९५ टक्के लोकांचा पहिली ते चौथी हिंदी भाषा लादण्याला विरोध; राज ठाकरेंच्या भेटीनंतर नरेंद्र जाधव म्हणाले...
20
"...तर गोळीचे उत्तर गोळ्याने दिले जाईल"; अमित शाह यांचा "नापाक" पाकिस्तानला सज्जड दम! विरोधकांवरही बरसले

घनदाट जंगलात २९ नक्षलवाद्यांना कंठस्नान; छत्तीसगडच्या कांकेरमध्ये भीषण चकमक, महाराष्ट्रातही अलर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2024 08:23 IST

छत्तीसगडच्या कांकेरमध्ये भीषण चकमक; तीन जवान जखमी; शस्त्रसाठा केला जप्त 

कांकेर / गडचिरोली : छत्तीसगडमधील कांकेर जिल्ह्यामध्ये सुरक्षा दलाच्या जवानांबरोबर मंगळवारी झालेल्या चकमकीत २९ नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. या चकमकीत सुरक्षा दलाचे तीन जवान जखमी झाले असून, घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा व दारूगोळा जप्त करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीपूर्वी ही घटना घडल्याने गडचिरोली पोलिसदेखील अलर्ट झाले आहेत.

नक्षलवाद्याचा गड समजल्या जाणाऱ्या अबुजमाड जंगलातील छत्तीसगडच्या छोटे बेठिया पोलिस ठाण्याच्या क्षेत्रात मंगळवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. सीमा सुरक्षा दल (बीएसएफ)  आणि राज्य पोलिसांच्या डिस्ट्रिक्ट रिझर्व्ह गार्ड (डीआरजी) यांनी नक्षलवाद्यांच्या शोधासाठी संयुक्त मोहीम हाती घेतली होती. कांकेर जिल्ह्यामध्ये नक्षलवाद्यांचा बीमोड करण्यासाठी बीएसएफचे जवान मोठ्या संख्येने तैनात करण्यात आले आहेत. यावेळी झालेल्या चकमकीत नक्षली कमांडर शंकर राव व ललिता ठार झाली आहे. 

छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलाच्या कारवाईत मंगळवारी अनेक नक्षलवादी मारल्या गेले. ही कारवाई यशस्वी करण्यासाठी जीवाची बाजी लावणाऱ्या सर्व जवानांचे कौतुक करतो आणि जखमी जवानांची प्रकृतीत सुधारणा व्हावी, यासाठी प्रार्थना करतो. सरकारचे नक्षलविरोधी धोरण आणि सुरक्षा दलाच्या प्रयत्नातून लवकरच देश नक्षलमुक्त करण्यात येईल. - अमित शाह, केंद्रीय गृहमंत्री

तीन जवान जखमीबीएसएफच्या जवानांसह तीन जवान चकमकीत जखमी झाले असून, त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे छत्तीसगड पोलिसांनी सांगितले. त्यापैकी एका जवानाच्या पायाला गोळी लागली असून, त्याची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात आले.  

नक्षलग्रस्त कांकेर जिल्हाछत्तीसगडमधील नक्षलवाद्यांचा गड असलेला कांकेर परिसर हा बस्तर जिल्ह्याचा भाग होता. १९९८ मध्ये कांकेरला स्वतंत्र जिल्हा घोषित करण्यात आला.  मंगळवारी झालेली चकमक ही बिनागुंडा व कोरोनार गावादरम्यान दुपारी घडली. २०२४ वर्ष सुरू झाल्यापासूनचार महिन्यात आतापर्यंत  बस्तर परिसरात तब्बल ७९ नक्षल्यांचा खात्मा करण्यात आला.

गडचिरोली पोलिस अलर्ट मोडवर- महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात गडचिरोली-चिमूरसाठी १९ एप्रिलला मतदान होत आहे. याअनुषंगाने १६ एप्रिललाच १५ हजारांहून अधिक सुरक्षा जवान तैनात झाले आहेत. दुर्गम, अतिदुर्गम भागात हेलिकॉप्टरने मतदान यंत्र व अधिकाऱ्यांना पोहोचविण्यात आले आहे.- मतदानाच्या तीन दिवस आधीच छत्तीसगड सीमेवर छत्तीसगड पोलिस व माओवाद्यांतील चकमकीनंतर २९ नक्षल्यांना कंठस्नान घालण्यात यश आले आहे. नक्षलवाद्यांसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.- या घटनेच्या अनुषंगाने ते पुन्हा खवळण्याची शक्यता लक्षात घेता, सुरक्षा यंत्रणा सजग झाली आहे. सीमावर्ती भागातील सर्व हालचालींवर नजर ठेवली जात असून, अनुचित प्रकार घडणार नाही, यासाठी पोलिस सज्ज आहेत, अशी माहिती पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी दिली.

मृतांपैकी दोन नक्षल्यांवर २५ लाखांचे बक्षीस- चकमकीच्या ठिकाणी सुरुवातीला १८ व नंतर ११ मृतदेह सापडले, त्यामुळे एकूण २९ माओवादी ठार झाले.- घटनास्थळावरून आधुनिक रायफल, सात एके ४७ रायफल, ३ एलएमजी जप्त करण्यात आले आहेत. चकमकीत ठार झालेला शंकर राव याच्यावर २५ लाखांचे बक्षीस होते.- कांकेर जिल्ह्यातील चकमकीत ठार झालेल्या नक्षलवाद्यांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.- गडचिरोलीपासून १९ किलोमीटर अंतरावर घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली असून, सुरक्षा यंत्रणा अलर्ट आहे.

...अन् अचानक झाला गोळीबार - लोकसभा निवडणुकांच्या आधी नक्षलग्रस्त भागात सुरक्षा दलांनी अधिक कडक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. - या भागांमध्ये निवडणूक प्रक्रियेत कोणताही अडथळा येऊ नये म्हणून ही पावले उचलण्यात आली आहेत.- बीएसएफ आणि जिल्हा राखीव गार्ड यांची संयुक्त टीम नक्षलविरोधी अभियानासाठी जात असताना नक्षल्यांनी अचानक गोळीबार केला. प्रत्युत्तरात  जवानांनीही गोळीबार केला. 

टॅग्स :Gadchiroliगडचिरोलीnaxaliteनक्षलवादी