शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

बालिका विद्यालयातील २८ विद्यार्थिनी आजारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2018 01:19 IST

कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयातील सुमारे २८ विद्यार्थिनी आजारी असल्याचे निदर्शनास आले आहे. चार मुलींची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना १ आॅक्टोबर रोजी रात्री ११ वाजता व पाच विद्यार्थिनींना २ आॅक्टोबर रोजी जिल्हा सामान्य रूग्णालयात हलविण्यात आले आहे.

ठळक मुद्देपालकांमध्ये खळबळ : नऊ विद्यार्थिनी गडचिरोलीत भरती

लोकमत न्यूज नेटवर्कधानोरा : कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयातील सुमारे २८ विद्यार्थिनी आजारी असल्याचे निदर्शनास आले आहे. चार मुलींची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना १ आॅक्टोबर रोजी रात्री ११ वाजता व पाच विद्यार्थिनींना २ आॅक्टोबर रोजी जिल्हा सामान्य रूग्णालयात हलविण्यात आले आहे. दोन मुली धानोरा येथील ग्रामीण रूग्णालयात भरती आहेत. तर उर्वरित १७ मुलींवर उपचार सुरू आहेत. विशेष म्हणजे, दोन दिवसांपूर्वी येथील विद्यार्थिनी सानिका बांबोळे या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला होता.शाळेतील २८ विद्यार्थिनींना टायफाईड, डोकेदुखी, ताप, पोटदुखी, घसा दुखणे, मलेरिया हे आजार झाले असल्याचे आढळले आहे. आश्रमशाळेमध्ये असुविधा असलेल्याचे दिसून येते. एवढ्या मोठ्या प्रमाणात विद्यार्थिनी प्रकृती बिघडल्याने पालक व शिक्षकांमध्ये खळबळ माजली आहे. वसतिगृहाची पाहणी केली असता, वसतिगृहात अस्वच्छता दिसून आली. परिसरातही अस्वच्छता पसरली आहे. पाण्याची टाकी फुटली आहे. शुध्द पाण्याकरिता लावलेला आरओ बंद स्थितीत आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर तहसीलदार महेंद्र गणवीर यांनी १ आॅक्टोबर रोजी रात्री १० वाजता धानोरा येथील ग्रामीण रूग्णालयात जाऊन आजारी विद्यार्थ्यांची विचारपूस केली. आरोग्य कर्मचाऱ्यांनी फवारणी करावी, असे निर्देश दिले. आरोग्य कर्मचाºयांनी विद्यालयात जाऊन ३७ विद्यार्थ्यांच्या रक्ताचे नमुने घेतले आहेत. तसेच पाण्याचेही नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. फवारणी सुध्दा करण्यात आली आहे. आरओ मशीन सुरू होईपर्यंत आरओच्या कॅनद्वारे पाणीपुरवठा केला जाणार आहे. संवर्ग विकास अधिकारी यशवंत भांड, गट शिक्षणाधिकारी सुधीर आखाडे, नगर पंचायतचे मुख्याधिकारी दामोधर भगत यांनी सुध्दा विद्यालयाला भेट देऊन स्थितीची पाहणी केली. या ठिकाणी स्वतंत्र आरोग्य पथक नेमावे, अशी मागणी होत आहे.मुलींची तब्येत बिघडण्याबाबत डॉ. देवेंद्र सावसाकडे यांना विचारणा केली असता, वातावरण बदल व दुषित पाण्यामुळे असा प्रकार घडू शकतो, अशी माहिती लोकमतशी बोलताना दिली.कर्मचाऱ्यांचा करार संपलाकस्तुरबा गांधी बालिका विद्यालयात शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी असे एकूण १५ कर्मचारी कार्यरत आहेत. त्यापैकी १२ कर्मचाऱ्यांचा ३० सप्टेंबर रोजी करार संपला आहे. करार संपला असला तरी सदर कर्मचारी शाळेमध्ये येत आहेत.

टॅग्स :Studentविद्यार्थीHealthआरोग्य