तालुक्यातील वासाळा येथे १० ते १२ दारूविक्रेते सक्रिय आहेत. वारंवार सूचना करूनही न जुमानता येथील दारूविक्रेते आपला अवैध व्यवसाय करीत आहेत. यामुळे आरमोरी पोलीस व मुक्तिपथने संयुक्तरीत्या मोहीम हाती घेतली. त्यानुसार, गावातील एका विक्रेत्याच्या घराची तपासणी केली असता त्याच्याकडून देशी दारूच्या २७ निपा जप्त करण्यात आल्या. याप्रकरणी विक्रेत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार घोडाम व बडे यांनी केली. यावेळी पोलीस पाटील अरविंद शेंडे, तालुका संघटक नीलम हरिणखेडे उपस्थित होत्या.
दुसरी कारवाई गावातील एका महिला दारूविक्रेत्याविरोधात करण्यात आली. तिच्या घरातून दोन लीटर मोहफुलाची दारू जप्त करून नष्ट करण्यात आली. पुन्हा दारू विक्री करणार नाही, अशी हमी या महिलेने दिली आहे. पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे गावातील अवैध विक्रेते धास्तावले आहेत.