शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
3
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
4
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
5
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
6
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
7
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
8
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
9
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
10
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
11
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
12
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
13
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
14
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
15
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे
16
डिंपल यादव यांच्याबद्दल वादग्रस्त विधान; मौलाना साजिद रशीदींना न्यूज चॅनेलच्या स्टुडिओमध्ये मारहाण
17
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
18
नवी मुंबईतील शिक्षिकेचं अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत घाणेरडं कृत्य, वडिलांनी बघताच पोलीस स्टेशन गाठले!
19
पत्नी झाली बेवफा! पतीला दारू पाजली अन् नाल्यात ढकलून दिलं; प्रियकरासोबत पळणारच होती, पण...
20
फराह खानचा कुक दिलीपचा पगार किती? आयटी कंपनीतील कर्मचाऱ्याची सॅलरी पण पडेल फिक्की!

दररोज २४ टन कचऱ्याची भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2020 06:00 IST

अर्ध्याअधिक रोगांचा प्रसार परिसरात असलेल्या दुर्गंधीमुळे होतो. त्यामुळे मानवी वस्तीत दुर्गंधी राहणार नाही यासाठी केंद्र व राज्य शासन विशेष आग्रही आहे. केंद्र शासनामार्फत स्वच्छ भारत अभियान राबविले जात आहे. या अभियानांतर्गत स्वच्छतेसाठी प्रत्येक शहराला तसेच गावाला कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जात आहे. स्वच्छतेबाबत अजुनही नागरिकांमध्ये जनजागृती झालेली नाही.

ठळक मुद्देप्लास्टिकचे सर्वाधिक प्रमाण । गडचिरोलीतील डम्पिंग यार्डवर निर्माण झाले आहेत मोठमोठे ढीग

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गडचिरोलीकर दरदिवशी सुमारे २४ टन कचरा निर्माण करतात. सदर कचरा घंटागाड्यांच्या माध्यमातून खरपुंडी मार्गावर असलेल्या डम्पिंग यार्डवर नेऊन टाकला जातो. त्यामुळे डम्पिंग यार्डवर कचऱ्याचे मोठमोठे ढिग निर्माण झाले आहेत. विशेष म्हणजे, या कचऱ्याचे वर्गीकरण केले जात नसल्याने कचºयाची समस्या आणखी गंभीर झाली आहे. सोबतच त्याची परिसरात दुर्गंधी पसरत आहे.अर्ध्याअधिक रोगांचा प्रसार परिसरात असलेल्या दुर्गंधीमुळे होतो. त्यामुळे मानवी वस्तीत दुर्गंधी राहणार नाही यासाठी केंद्र व राज्य शासन विशेष आग्रही आहे. केंद्र शासनामार्फत स्वच्छ भारत अभियान राबविले जात आहे. या अभियानांतर्गत स्वच्छतेसाठी प्रत्येक शहराला तसेच गावाला कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जात आहे. स्वच्छतेबाबत अजुनही नागरिकांमध्ये जनजागृती झालेली नाही.प्रत्येक व्यक्ती आपल्या गरजा पूर्ण करताना काही प्रमाणात कचरा निर्माण करतात. कचरा निर्माण होणे ही स्वाभाविक बाब आहे. फळांची साल, भाजीपाला इत्यादीच्या माध्यमातून तयार होणाऱ्या कचऱ्याला ओला कचरा संबोधले जाते. तर या कचराव्यतिरिक्त प्लास्टिक, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, घरातील एखादी वापराची वस्तू याला सुका कचरा म्हटले जाते. घरात निर्माण झालेला कचरा दोन वेगवेगळ्या कुंड्यांमध्ये साठविणे आवश्यक आहे. मात्र असे होताना दिसत नाही.डम्पिंग यार्डवर सर्व कचरा एकत्र राहतो. त्यातून दुर्गंधी पसरत आहे. याच परिसरात एक शाळा असल्यामुळे तेथील विद्यार्थ्यांवर या दुर्गंधीमुळे प्रकृती बिघडण्याची वेळ आली आहे. जमा होणाऱ्या एकूण कचऱ्यामध्ये ५० टक्केपेक्षा अधिक कचरा प्लास्टिकचा राहतो. शासनाने ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिकवर बंदी घातली आहे. तरीही सदर प्लास्टिक वापरले जात असल्याचा पुरावा येथे पहायला मिळतो. विशेष म्हणजे, एकदा तयार झालेली प्लास्टिक किमान ५०० वर्ष जमिनीत कुजत नाही. एक ते दोन वर्ष तर रंग सुध्दा जात नाही. त्यामुळे प्लास्टिकची समस्या गंभीर होणार आहे. शक्यतो प्लास्टिकचा वापर करू नये, असे आवाहन नगर परिषद व शासनामार्फत करण्यात येत असले तरी प्रत्येक व्यक्ती प्लास्टिकचा वापर करीत असल्याचे दिसून येते. एकूण कचऱ्यामध्ये ५० टक्केहून अधिक कचरा केवळ प्लास्टिकचा राहते. त्यामुळे डम्पिंग यार्डवर जिकडे तिकडे प्लास्टिकचे ढीग दिसून येतात.कचऱ्याचे वर्गीकरण करणे आवश्यकप्रत्येक घरात दोन कचराकुंड्या ठेवून ओला व सुका कचरा दोन वेगवेगळ्या कचराकुंड्यांमध्ये ठेवावा. मात्र असे वर्गीकरण नागरिक करीत नाही. ओल्या कचऱ्यापासून कंपोस्ट खत तयार करता येते. तर सुक्या कचऱ्यावर वेगवेगळी प्रक्रिया करता येते. कचऱ्याचे वर्गीकरण करण्यासाठी नगर परिषदेला लाखो रुपये खर्च करावे लागतात.ओला व सुका कचरा दोन वेगवेगळ्या डब्यांमध्ये टाकावा, या विषयी नगर परिषदेमार्फत जागृती केली आहे. तरीही नागरिक एकाच ठिकाणी कचरा गोळा करतात. कचºयाचे वर्गीकरण करणे ही अतिशय कष्टप्रद व खर्चीक बाब आहे. त्यामुळे नागरिकांनी कचऱ्याचे वर्गीकरण करूनच तो घंटागाडीत टाकावा.- संजीव ओहोळ, मुख्याधिकारी, नगर परिषद गडचिरोली

टॅग्स :dumpingकचरा