शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
2
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
3
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात
4
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
5
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
6
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
7
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
8
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
9
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
10
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
11
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
12
दहशतवाद्यांवर २० लाखांचे बक्षीस, दोन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी; शेकडो जवानांकडून शोधमोहीम
13
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
14
साधनसंपत्ती तरीही लोक राहिले गरिब; ओडिशात पंतप्रधान माेदींचा हल्लाबाेल
15
कोणत्या भागातून किती लीड मिळते, त्यावर महापालिकेसाठी उमेदवार ठरविले जातील
16
गृहकर्ज थकबाकी वाढली १० लाख कोटी रुपयांनी; रिझर्व्ह बँकेच्या अहवालातून उघडकीस
17
मराठी मते भाजपच्या पारड्यात की काँग्रेसच्या? दोन्ही उमेदवारांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा अनुभव नाही
18
रशिया अण्वस्त्रांसह लष्करी सराव करणार; अमेरिकेसह पश्चिमी देशांना दिला इशारा
19
न होणाऱ्या प्रवासाची तिकिटे विकली प्रवाशांना; विमान कंपनीला ७.९ कोटी डॉलरचा दंड
20
ऑर्डर्स वाढल्या, नोकऱ्या मिळाल्या; सेवा क्षेत्रात तेजीचा १४ वर्षांचा उच्चांक, खासगी क्षेत्राचाही विस्तार

२००० ग्राहक वीज मीटरच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2018 12:12 AM

मागणीच्या तुलनेत महावितरणकडे कमी प्रमाणात मीटर उपलब्ध असल्याने मागील दोन महिन्यांपासून जवळपास दोन हजार वीज ग्राहकांचे अर्ज पडून आहेत. अनेकांनी डिमांड सुध्दा भरले आहे. मात्र वीज मीटर उपलब्ध करून देण्यात आले नाही.

ठळक मुद्देनागरिकांनी भरले डिमांड : दोन महिन्यांपासून अर्ज पडून

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : मागणीच्या तुलनेत महावितरणकडे कमी प्रमाणात मीटर उपलब्ध असल्याने मागील दोन महिन्यांपासून जवळपास दोन हजार वीज ग्राहकांचे अर्ज पडून आहेत. अनेकांनी डिमांड सुध्दा भरले आहे. मात्र वीज मीटर उपलब्ध करून देण्यात आले नाही.वाढत चालल्या घरांच्या संख्येबरोबरच वीज जोडणीची मागणी सुध्दा वाढत चालली आहे. काही नागरिक घर बांधकामापूर्वीच वीज जोडणीसाठी अर्ज करतात. तर काही नागरिक घराचे बांधकाम झाल्यानंतर अर्ज करतात. मात्र महावितरणकडे अपवाद वगळता नेहमीच वीज मीटरचा तुटवडा राहतो. वर्षभरापूर्वी मागणी एवढे मीटर प्रत्येक जिल्ह्यात उपलब्ध करून दिले जातील, असे आश्वासन महावितरणच्या वतीने देण्यात आले होते. मात्र हे आश्वासन अल्पावधीतच फोल ठरले आहे. दोन महिन्यांपासून अर्ज करूनही वीज मीटर उपलब्ध करून देण्यात आले नाही. ग्राहक महावितरणच्या कार्यालयात जाऊन वीज मीटरबाबत विचारणा करीत आहेत. आठ दिवसात मीटर उपलब्ध होतील, असे आश्वासन महावितरणच्या अभियंत्यांकडून दिले जात आहे. पुढचे आठ दिवस म्हणत आता दोन महिन्यांचा कालावधी उलटला आहे. मात्र मीटरचा पत्ता नाही. काही नागरिकांनी नवीन घरात राहण्यास सुरूवात केली. मात्र वीज जोडणी झाली नसल्याने आता या नागरिकांचे हाल होत आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन मागणी एवढे वीज मीटर उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी ग्राहकांकडून होत आहे. शेतकऱ्यांचेही अनेक अर्ज महावितरणकडे प्रलंबित आहेत.ग्राम स्वराज्य योजनेचा सामान्य वीज ग्राहकांना फटकागडचिरोली जिल्ह्यात १ जूनपासून ग्राम स्वराज्य अभियान टप्पा २ राबविला जात आहे. या अभियानात वीज विभागाचाही समावेश करण्यात आला आहे. यासाठी ५४ गावांची निवड करण्यात आली आहे. या ५४ गावातील ज्या नागरिकांच्या घरी वीज पुरवठा झाला नाही. त्यांना ३१ जुलैच्या आत कोणत्याही परिस्थितीत वीज पुरवठा उपलब्ध करून देण्याचे निर्देश आहेत. त्यामुळे महावितरणने सर्वसामान्य ग्राहकांना वीज मीटर देणे बंद करून उपलब्ध असलेले मीटर ग्रामस्वराज्य अभियानात निवडलेल्या लाभार्थ्यांना लावले जात आहेत. सदर काम अतिशय गतीने सुरू आहे. १ जून ते १८ जुलै या कालावधीत सुमारे ८९६ वीज जोडण्या देण्यात आल्या आहेत. यामध्ये गडचिरोली तालुक्यात ५१, देसाईगंज ३३, कुरखेडा ८९, कोरची ५८, चामोर्शी ४६, एटापल्ली ९०, भामरागड १८२ आलापल्ली १७६, सिरोंचा तालुक्यात १७१ वीज जोडण्या दिल्या आहेत.ग्रामस्वराज्य अभियान अंतर्गत वंचित घरांना वीज पुरवठा देण्याचे काम सुरू आहे. महावितरणकडे उपलब्ध मीटर या योजनेंतर्गत लावले जात आहेत. त्यामुळे सामान्य ग्राहकांना मीटर मिळण्यास विलंब होत आहे. लवकरच पुरेसे मीटर उपलब्ध होतील व सामान्य ग्राहकांनाही वीज मीटर मिळतील.- अनिल बोरसे, अधीक्षक अभियंता,महावितरण गडचिरोली

टॅग्स :electricityवीज