शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
6
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
7
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
8
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
9
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
10
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
11
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
12
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
13
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
14
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
17
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
18
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
20
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप

सिरोंचातील युवकांकडून १९ लाखांच्या जुन्या नोटा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2017 10:08 PM

जुन्या नोटांच्या बदल्यात नवीन नोटा आणण्यासाठी जाणाºया पाच युवकांना तेलंगणा पोलिसांनी अटक केली असून त्यांच्या जवळील १९ लाख रूपयांच्या जुन्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत.

ठळक मुद्देतेलंगणा पोलिसांची कारवाई : पाच जणांना अटक

लोकमत न्यूज नेटवर्कसिरोंचा : जुन्या नोटांच्या बदल्यात नवीन नोटा आणण्यासाठी जाणाºया पाच युवकांना तेलंगणा पोलिसांनी अटक केली असून त्यांच्या जवळील १९ लाख रूपयांच्या जुन्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. सदर कारवाई गेल्या रविवारी तेलंगणा राज्यात करण्यात आलीे. एवढ्या मोठ्या प्रमाणात जुन्या नोटा सिरोंचा येथे कुठून आल्या? असा प्रश्न उपस्थित होत आहे.अटक केलेल्या आरोपीमध्ये जमील शेख, शफी शेख, तुलसी गारी तिघेही रा. सिरोंचा व सीताराम नेराला, बालस्वामी रमेश दोघेही रा. तेलंगणा यांचा समावेश आहे. सिरोंचा येथील आरोपींनी तेलंगणातील सिताराम नेराला व बालस्वामी रमेश या दोघांना भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून १९ लाख रूपयांच्या जुन्या नोटा असून या ऐवजी नवीन नोटा देण्याबाबत करार केला. त्यानंतर हे पाचही युवक जुन्या नोटा घेऊन तेलंगणा राज्यातील पेदामपेठा येथे जात होते. दरम्यान पेदामपेठा येथील पोलीस तपासणी नाक्यावर या पाचही जणांच्या हालचाली संशयास्पद आढळल्याने थैलीची चौकशी केली. या थैलीमध्ये १९ लाख रूपयांच्या जुन्या नोटा आढळून आल्या. यामध्ये एक हजार रूपयांच्या एकूण तीन लाखांच्या नोटा व ५०० रूपयांच्या एकूण १६ लाख रूपयांच्या नोटा आढळून आल्या.नोटबंदी होऊन एक वर्षाचा कालावधी पूर्ण झाला आहे. तरीही सिरोंचा येथे सुमारे १९ लाख रूपयांच्या जुन्या आढळून आल्या. एवढी मोठी रक्कम सिरोंचा येथे आली कुठून असा प्रश्न उपस्थित होत आहे. सविस्तर चौकशीची मागणी होत आहे.