जोगीसाखरा भागातील १९ मजूर कर्नाटकात अडकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2020 06:00 AM2020-03-30T06:00:00+5:302020-03-30T06:00:45+5:30

मागील चार महिन्यांपूर्वी जोगीसाखरा, शंकरनगर येथील मजूर रोजगारासाठी व कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविण्यासाठी कर्नाटकात गेले. महाराष्ट्राच्या पुणे येथील राज ग्रुप कंट्रक्शन कंपनीमार्फत कर्नाटक राज्याच्या बिजापूर जिल्ह्यातील बागेवाडी तालुक्यातील कोलार येथे गेले. दरम्यान देशभरात कोरोना विषाणूचा संसर्ग पसरला. आता संचारबंदीमुळे हे मजूर अडकून पडले आहेत.

19 laborers from Jogisakhara area are trapped in Karnataka | जोगीसाखरा भागातील १९ मजूर कर्नाटकात अडकले

जोगीसाखरा भागातील १९ मजूर कर्नाटकात अडकले

Next
ठळक मुद्देकोरोना संचारबंदीचा परिणाम : सीसी रस्त्याच्या कामासाठी गेले होते

लोकमत न्यूज नेटवर्क
जोगीसाखरा : भूमिगत नाली व सिमेंट काँक्रीट रस्त्याच्या कामावर मजूर म्हणून आरमोरी तालुक्याच्या जोगीसाखरा परिसरातील १९ मजूर कर्नाटक राजाच्या बिजापूर तालुक्यातील कोलार येथे चार महिन्यापूर्वी गेले. सदर मजूर कोरोनाच्या संचारबंदीमुळे कर्नाटक राज्यात अडकले आहेत. त्यांच्याकडील जीवनावश्यक साहित्य संपले असून काम बंद झाल्याने त्यांच्यापुढे उदरनिर्वाहचा प्रश्न निर्माण झाला आहे.
महाराष्ट्र सरकारने सदर १९ मजुरांना मदत करावी, अशी मागणी अडकलेल्या मजुरांनी केली आहे. मागील चार महिन्यांपूर्वी जोगीसाखरा, शंकरनगर येथील मजूर रोजगारासाठी व कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविण्यासाठी कर्नाटकात गेले. महाराष्ट्राच्या पुणे येथील राज ग्रुप कंट्रक्शन कंपनीमार्फत कर्नाटक राज्याच्या बिजापूर जिल्ह्यातील बागेवाडी तालुक्यातील कोलार येथे गेले. दरम्यान देशभरात कोरोना विषाणूचा संसर्ग पसरला. आता संचारबंदीमुळे हे मजूर अडकून पडले आहेत. त्यांच्याकडील जीवनावश्यक वस्तू व इतर साधन सामग्री पूर्णत: संपल्याने १९ मजुरांना कोलारचे पोलीस स्टेशन गाठले. आम्हाला महाराष्ट्र राज्यात जाण्याची परवानगी द्या, नाही तर भोजनाची व्यवस्था करा, अशी विनंती केली. मात्र त्यांना हवी तशी मदत मिळाली नाही. तसेच जाण्यासाठी परवानगी मिळाली नाही. अशी माहिती लोकमत प्रतिनिधीला दिली. देशभर संचारबंदी लागू झाली असून जिल्हा बंदी करण्यात आली आहे. गाव सोडून कर्नाटक राज्यातील कोलार शहरातील गेलेले १९ मजूर अडकून पडले. या मजुरांना सरकारने मदत करावी, अशी मागणी मजुरांनी केली आहे. अडकून पडलेल्या मजुरांमध्ये अनिल चौके, नितीन मानकर, विकास देवनाथ, देव्रत माझी, निखील सूर्यवशी, देवेंद्र राय, सुनिल माझी, पंकज सरकार, सचिन ठाकरे, रियाज शेख, अश्विन नेवारे, अजय मडावी, मुकेश माझी, त्रिलोक धोगडे, शूक्षय मंडल, सपन मुजुमदार, त्रिदेव मित्री, प्रदिप माटे, सुजल सरकार व दिनेश माझी आदींचा समावेश आहे.

नेहरपायलीतील १४ मजूर अडकले
कुरखेडा तालुक्याच्या नेहरपायली या गावातील १४ मजूर मिरची तोडण्याच्या कामासाठी तेलंगणातील पिंजरमडगू गावात गेले. मात्र आता कोरोनामुळे संचारबंदी झाल्याने ते मजूर तेलंगणातच अडकून पडले आहेत. तेलंगणा राज्यातील खमम जिल्ह्याच्या कानपल्ली तालुक्यातील पिंजर मडगू गावात मिरचीचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. मिरची तोडण्यासाठी कुरखेडा तालुक्यातील मजूर या गावात रोजगारासाठी गेले. मात्र आता संचारबंदीने हे मजूर तेलंगणात अडकले आहेत. स्थानिकस्तरावर त्यांना कोणत्याही प्रकारची मदत मिळत नसल्याने ते अडचणीत सापडले आहेत.

भेंडाळा परिसरातील नागरिकही दुसऱ्या राज्यात
चामोर्शी तालुक्याच्या भेंडाळा परिसरातील कान्होली, कळमगाव, एकोडी, सगणापूर, घारगाव, खोपुर्डी, रामाळा, दोटकुली, मोहुर्ली, फराडा, वाघोली, भेंडाळा, वेलतूर आदी गावातील मजूर तेलंगणा राज्यात मिरची तोडण्याकरिता गेले आहेत. कान्होली येथील जवळपास १०० नागरिक तेलंगणाच्या खमंग जिल्ह्यातील केसपल्ली येथे अडकले आहेत. परंतु संचारबंदी लागू असल्याने त्यांना स्वगावी येण्यासाठी अडचणी येत आहेत.

Web Title: 19 laborers from Jogisakhara area are trapped in Karnataka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.