शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

पोलिसांनी बांधल्या १८ जोडप्यांच्या लग्नगाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 23:06 IST

नवतरुण युवक-युवतींसह अनेक वर्षांपासून एकत्र राहात असले तरी प्रत्यक्षात विवाहबद्ध न झालेल्या जोडप्यांच्या लग्नगाठी बांधण्याचे पुण्यकर्म पोलिसांनी सोमवारी रेगडी येथील जनजागरण मेळाव्यात केले. यावेळी वाजतगाजत आणि मोठ्या उत्साहात १८ जोडप्यांचा विधीवत विवाह सोहळा पार पडला.

ठळक मुद्देरेगडीतील जनजागरण मेळावा : नागरिकांनी विकासासाठी लोकशाही मार्गाने प्रयत्न करावे- डॉ.कवडे

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : नवतरुण युवक-युवतींसह अनेक वर्षांपासून एकत्र राहात असले तरी प्रत्यक्षात विवाहबद्ध न झालेल्या जोडप्यांच्या लग्नगाठी बांधण्याचे पुण्यकर्म पोलिसांनी सोमवारी रेगडी येथील जनजागरण मेळाव्यात केले. यावेळी वाजतगाजत आणि मोठ्या उत्साहात १८ जोडप्यांचा विधीवत विवाह सोहळा पार पडला.पती-पत्नीसारखे एकत्रित राहात असूनही काही जोडप्यांचा अधिकृत विवाह झालेला नव्हता. त्यामुळे त्यांना शासकीय योजनांपासून वंचित राहावे लागत होते. अशा जोडप्यांसह नव्याने विवाह जुळलेल्या नवतरुण युवक-युवतींचा शेकडो वऱ्हाड्यांच्या साक्षीने रितसर विवाह झाल्याने त्यांना विवाहाचे प्रमाणपत्र आणि शासनाच्या विविध योजनांचे लाभही याचवेळी देण्यात आले.गडचिरोलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.सागर कवडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून चामोर्शीचे नायब तहसीलदार एस.के.बावणे, घोटचे महसूल मंडळ अधिकारी एस.व्ही.सरपे, रेगडीचे सरपंच बाजीराव गावळे, वैद्यकीय अधिकारी डॉ.चित्रा जावंजाळ, पोलीस पाटील संघटनेचे जिल्हाध्यक्ष शरद ब्राम्हणवाडे, चामोर्शी तालुका पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष अनिल कुकुडकर आदी प्रामुख्याने उपस्थित होते.यावेळी पारंपरिक आदिवासी लोकनृत्य सादर करून नवरदेवांना वाजतगाजत मेळाव्याच्या ठिकाणी आणण्यात आले. त्या ठिकाणी सामूहिक विवाह सोहळा पार पडला. अध्यक्षीय मार्गदर्शनात एसडीपीओ डॉ.सागर कवडे म्हणाले, मेळाव्याच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचल्या पाहीजे. नागरिकांनी विकासाकरिता सामूहिक प्रयत्न करणे गरजेचे आहे. सत्य आणि अहिंसेचा मार्ग अवलंबून लोकशाही मार्गाने नागरिकांनी विकास करावा, भरकटलेल्या नक्षलवाद्यांनी मुख्य प्रवाहात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.कार्यक्रमाचे संचालन रेगडी पोलीस मदत केंद्राचे उपनिरीक्षक धनाजी खापरे यांनी तर आभार प्रभारी पोलीस अधिकारी राहुल बांगर यांनी मानले. यावेळी रेगडी आश्रमशाळेचे मुख्याध्यापक केव्हे, विकासपल्लीचे क्षेत्र सहायक घारूडे, देवदाचे क्षेत्र सहायक गजबे, घोट मदत केंद्राच्या प्रभारी अधिकारी अंजली राजपूत, रेगडी पोलीस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी राहुल बांगर, उपनिरीक्षक धनाजी खापरे, माडेआमगावच्या सरपंच रसिका मोहंदा, रेगडी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष देवराव खंडरे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.एकाच मंडपात विविध योजनांचा लाभ मिळाल्याने गावकऱ्यांनी पोलीस व प्रशासनाबद्दल समाधान व्यक्त केले.विविध योजनांचा लाभया जनजागरण मेळाव्यात आदिवासी विकास विभागाकडून ८ लाभार्थ्यांना प्रतिनग ३० पीव्हीसी पाईप वाटप करण्यात आले. तसेच वनविभागाकडून दोन लोकांना नुकसानभरपाईचे धनादेश वाटप करण्यात आले. माडेआमगाव येथील ग्रामपंचायतअंतर्गत ग्रामसभेचा ठराव घेऊन अपंग महिलेस एक तीनचाकी सायकल देण्यात आले. याशिवाय १५ जणांना वाहन परवाना, २० जणांना आधार कार्ड, ५ जणांना तेंदू बोनस धनादेश, ३ जणांना महसूल विभागाचे धनादेश मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात आले.तंटामुक्त गाव समित्यांचे सहकार्यया जनजागरण मेळाव्याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी तसेच सामूहिक विवाह सोहळ्यात विवाहबद्ध होण्यासाठी गावागावात माहिती पोहोचविण्याचे काम तंटामुक्त गाव समित्यांनी करून हा विवाह सोहळा आणि मेळावा यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले.विवाह नोंदणी प्रमाणपत्र व धनादेशयावेळी विवाहबद्ध झालेल्या दाम्पत्यांना शासनाच्या वतीने आदिवासी विकास विभागाच्या विवाह योजनेअंतर्गत १० हजार रुपयांचे धनादेश व विवाह नोंदणी प्रमाणपत्र देण्यात आले. यासोबतच विविध योजनांचे लाभ नवदाम्पत्यांना लगेच देण्यात आल्याने ते हरखून गेले होते.