शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
2
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
4
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
5
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
6
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
7
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
8
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
9
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
10
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती
11
संघ शताब्दी आणि राज्यघटना; शताब्दीच्या उंबरठ्यावर रा.स्व.संघ आणि 'अमृतमहोत्सवी' संविधान!
12
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
13
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
14
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
15
शताब्दी वर्षात संघाचे ध्येय: 'राष्ट्रसेवेत' समाजाचा सहभाग! स्वयंसेवकांचे कुटुंब कसे बनले संघाच्या कार्याचे केंद्र?
16
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
17
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
18
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
19
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
20
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख

सिरोंचात १७ टक्के बालके कुपोषित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2020 05:00 IST

सिरोंचा तालुक्याचा ८० टक्के भाग जंगलाने व्यापला आहे. तालुक्यात सिरोंचा येथे ग्रामीण रूग्णालय तसेच अंकिसा, टेकडाताला, मोयाबिनपेठा, झिंगानूर या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. सिरोंचा तालुका विस्ताराने मोठा असला तरी लोकसंख्या विरळ आहे. लोकसंख्येच्या प्रमाणात आरोग्य सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. त्यामुळे आरोग्य केंद्राच्या सभोवताल असलेल्या गावांची संख्या अधिक आहे.

ठळक मुद्देआरोग्य सेवा बळकट करण्याची गरज : गरोदर महिलांच्या आहार योजनेच्या अंमलबजावणीत दोष

कौसर खान।लोकमत न्यूज नेटवर्कसिरोंचा : सिरोंचा तालुक्यातील एकूण बालकांच्या सुमारे १७ टक्के बालके कुपोषित जन्माला येतात. या बालकांचे पोषण करून सुदृढ बनविण्यासाठी आरोग्य विभागाला तारेवरची कसरत करावी लागत आहे.आरोग्य विभागाच्या सन २०१९-२० या वर्षातील प्रसूती अहवालानुसार सिरोंचा तालुक्यात एप्रिल २०१९ ते मार्च २०२० या कालावधीत जन्मलेल्या एकूण बालकांपैकी सरासरी १७.२२ टक्के बालके कुपोषित आढळून आली आहेत.सिरोंचा तालुक्याचा ८० टक्के भाग जंगलाने व्यापला आहे. तालुक्यात सिरोंचा येथे ग्रामीण रूग्णालय तसेच अंकिसा, टेकडाताला, मोयाबिनपेठा, झिंगानूर या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. सिरोंचा तालुका विस्ताराने मोठा असला तरी लोकसंख्या विरळ आहे. लोकसंख्येच्या प्रमाणात आरोग्य सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. त्यामुळे आरोग्य केंद्राच्या सभोवताल असलेल्या गावांची संख्या अधिक आहे. तसेच आरोग्य केंद्रापासून गावांचे अंतरही अधिक आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरात जवळपास २० ते २५ किमी अंतरावरील गावांचा समावेश आहे. त्यामुळे या गावांना आरोग्य सुविधा पुरविताना आरोग्य कर्मचाऱ्यांची दमछाक उडत आहे.दुर्गम भागातील नागरिक आरोग्याबाबत फारसे जागरूक नाही. तसेच गरिबीमुळे गरोदर माताही पौष्टिक आहार घेत नाही. परिणामी कुपोषित बाळ जन्माला येते. त्यानंतरही बाळाची योग्य काळजी घेतली जात नसल्याने बाळ कुपोषणाच्या विळख्यात अडकते. आरोग्य विभागाकडे एप्रिल २०१९ ते मार्च २०२० या कालावधीत असलेल्या माहितीनुसार तालुक्यातील सुमारे १७.२२ टक्के बालके कुपोषित जन्माला येतात. एप्रिल २०१९ ते मार्च २०२० या कालावधीत एकूण ५८१ बालके जन्मली. त्यापैकी ९८ बालके कुपोषित जन्माला आली आहेत.सिरोंचा तालुक्यात अंकिसा, टेकडाताला, मोयाबिनपेठा व झिंगानूर अशी चार प्राथमिक आरोग्य केंद्र असून या केंद्रांतर्गत उपकेंद्र आहेत. अर्भक, बाल व मातामृत्यू रोखण्यासाठी रूग्णालयात म्हणजेच संस्थात्मक प्रसूतीचे प्रमाण वाढविण्यावर आरोग्य विभागाने भर दिला. यासाठी ग्रामीण भागात जनजागृती करून गर्भवती महिलेची प्रसूती ही रूग्णालयातच करावी, असे आरोग्य विभागाकडून सांगण्यात येते. मात्र सिरोंचा तालुक्याच्या दुर्गम भागात अशिक्षितपणा, औषधोपचाराबाबत सांशक्ता तसेच पूजारांकडून उपचार करून घेण्यावर अनेकांचा प्रयत्न असतो. या सर्व कारणांमुळे सिरोंचा तालुक्यात अर्भक व बालमृत्यूचे प्रमाण कमी होत नसल्याचे दिसून येत आहे.केंद्र व राज्य सरकारचा कोट्यवधी रुपयांचा निधी कुपोषण निर्मूलनाच्या कामावर आजवर खर्च झाला. मात्र जिल्ह्याच्या आदिवासी व जंगलव्याप्त भागातील बालकांच्या कुपोषणाची समस्या कमी झाली नाही. कुपोषण निर्मूलनासाठी ठोस उपाययोजना प्रभाविपणे राबविण्याची गरज आहे.संस्थात्मक प्रसुतीचे प्रमाण वाढतीवरसिरोंचा शहरातील ग्रामीण रूग्णालय तसेच अंकिसा, टेकडाताला, मोयाबिनपेठा व झिंगानूर आदी प्राथमिक केंद्र मिळून वर्षभरात एकूण ५४६ गरोदर महिलांची प्रसूती झाली. यापैकी ५३४ महिलांची प्रसूती संस्थात्मक प्रसूती झाली. म्हणजेच ग्रामीण रूग्णालये व प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रसूतीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. काही गरोदर महिला प्रसूतीसाठी रूग्णालयापर्यंत पोहोचत नसल्याने त्यांची प्रसूती घरीच होत असते. वर्षभरात सिरोंचा तालुक्यात १२ महिलांच्या प्रसूती घरी झाल्या आहेत. संस्थात्मक प्रसूतीचे प्रमाण वाढतीवर आहे.

टॅग्स :Healthआरोग्य